BCCI चा 'तो' निर्णय अन् चाहत्यांच्या निषेधाचे उग्र रूप समोर(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल 2025 एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले होते. आता ते आयपीएल शनिवारपासून म्हणजेच आजपासून (१७ मे) पासून पुन्हा सुरू होणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडणार आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मोठी स्पर्धा रंगळिया आहे. सर्व संघांनी यासाठी सज्जता दाखवली आहे. पण अशातच बीसीसीआयसमोर एक मोठी समस्या उभी ठाकली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका निर्णयामुळे कोलकात्याचे क्रिकेट प्रेमी खूप संतापलेले आहेत. शुक्रवारी (१६ मे) त्यांनी ईडन गार्डन्सबाहेर निदर्शने देखील केलीय आहेत.
हेही वाचा : Babar Azam ने केली टी-२० ची वर्ल्ड ११ टीम जाहीर! ‘किंग’ कोहलीला नाकारले; ‘या’ दोन भारतीयांना संघात स्थान..
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे पार पडणार होता. परंतु भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे ही लीग एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. आता ते शनिवार (१७ मे) पासून पुन्हा सुरू होणार आहे. परंतु आता असा अंदाज लावला जात आहे, की अंतिम सामना कोलकातामध्ये खेळावला जाणार नाही. याबद्दल कोलकाता क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. १६ मे रोजी ईडन गार्डन्स स्टेडियमबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत.
निदर्शकांनी म्हटले आहे की, या हंगामाचा अंतिम सामना त्याच ठिकाणी खेळवण्यात यावा जिथे तो नियोजित करण्यात आला होता. आंदोलकांकडून बीसीसीआयला त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निदर्शनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी खेळवण्यात येणार होता. जो आता पुढे ढकलून ३ जून रोजी खेळवला जाणार आहे. याशिवाय, आता विजेतेपदाचा सामना कोलकाताऐवजी अहमदाबादमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची या हंगामातील क्वालिफायर २ आणि अंतिम सामन्याचे आयोजन करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही सामने १ आणि ३ जून रोजी खेळवले जाणारआहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावामुळे, आयपीएल 2025 बीसीसीआयने एका आठवड्यासाठी स्थगित केली होती. यानंतर, युद्धबंदीनंतर, बीसीसीआयने आयपीएल २०२५ चे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार, आजपासून आयपीएल पुन्हा सुरू होणार असून आता अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाणार आहे.