फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा T२० सामना : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या पाच सामान्यांची T२० मालिका सुरु आहे. यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिकेत दबदबा पाहायला मिळाला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यांमध्ये चित्र पलटताना दिसले. कोलकाता आणि चेन्नईतील पराभवानंतर राजकोटमध्ये ब्रिटिशांची कामगिरी दमदार होती. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघाने तिस-या टी-२० सामन्यात चमकदार कामगिरी करत 26 धावा केल्या. या विजयासह इंग्लंडने मालिकेतही स्वतःला जिवंत ठेवले आहे.
चौथा T२० आंतरराष्ट्रीय सामना आता पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सूर्या आणि कंपनी या मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेण्याकडे लक्ष देईल. त्याचबरोबर इंग्लंड मालिकेत २-२ अशी बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. सूर्यकुमार यादवच्या संघाला आज मालिकेमध्ये विजय मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे आज भारताच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील तीन सामन्यांमध्ये मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने कमालीची कामगिरी केली आहे. मागील सामन्यांमध्ये त्याने संघासाठी पाच विकेट्स घेऊन टीम इंडियाच्या चाहत्यांना चकित केले.
Rajkot ✈️ Pune#TeamIndia have arrived for the 4th #INDvENG T20I 😎@IDFCFIRSTBank pic.twitter.com/gnFfioFWQW
— BCCI (@BCCI) January 29, 2025
आयसीसी T२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंची कामगिरी दिसून आली आहे. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने २५ स्थानांनी झेप घेतली आहे, तर टिळक वर्मा नंबर १ बॅट्समन बनण्याच्या जवळ आहे. त्याचबरोबर आदिल रशीदची जादू गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे, जो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज बनला आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.
Not the result #TeamIndia were looking for in Rajkot, but Varun Chakaravarthy put on a solid show with the ball to bag the Player of the Match award!
Scorecard ▶️ https://t.co/amaTrbtzzJ#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/D6dKptsI7M
— BCCI (@BCCI) January 28, 2025
मागील सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याने २ विकेट्स घेतले होते त्याचबरोबर हार्दिकने फलंदाजीमध्ये सुद्धा महत्वाचे योगदान दिल होते. हार्दिक पांड्याने मागील सामन्यांमध्ये संघासाठी ४० धावांची खेळी खेळली होती पण १९व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूंवर बाद झाला आणि सामना टीम इंडियाच्या हातून निसटला. हार्दिक पांड्याच्या व्यतिरिक्त कोणताही खेळाडू चांगली कामगिरी करू शकला नाही. पहिल्या दोन सामान्यांबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या सामन्यात अभिषेक शर्माने संघासाठी कमालीची कामगिरी केली होती.
दुसऱ्या सामन्यांमध्ये तिलक वर्माने टीम इंडियासाठी शतक ठोकून सामन्यात विजय मिळवून दिला होता. त्याचबरोबर वरून चक्रवर्तीने संघासाठी सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे.