फोटो सौजन्य - X
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये झालेल्या पाच सामन्याच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडीयाची नजर ही आशिया कपवर असणार आहे. भारताच्या संघ हा अ संघामधुन खेळणार आहे. या संघामध्ये तीन टीम आहेत. भारताचे तीन साखळी सामने होणार आहेत. पहिला सामना हा युएई विरुद्ध होणार आहे तर दुसरा सामना हा पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाचा शेवटचा आशिया कपमधील साखळी सामना हा ओमानविरुद्ध होणार आहे. भारताच्या आशिया कपसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने संघासाठी इंग्लड दौऱ्यावर तीन सामने खेळले होते. तर यामध्ये त्याने दुसरा आणि पाचवा सामना खेळला नाही त्याला बीसीसीआयने विश्रांती दिली होती. सोशल मिडीयावर अनेक चर्चा सुरु होत्या यामध्ये त्यांनी जसप्रीत बुमराह हा भारतीय संघासाठी आशिया कपमध्ये खेळणार की नाही यावर चाहत्यांना प्रश्नचिन्ह होते. आता याच्या संदर्भात अनेक अपडेट समोर आल्या आहेत.
Ronaldo engaged : अखेर तो क्षण आलाच…पाच पोरांचा बाप झाल्यानंतर रोनाल्डोने घेतला लग्नाचा निर्णय
भारताचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह हा आशिया कप खेळणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये मात्र, या स्पर्धेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. यावेळी ही स्पर्धा टी-२० स्वरूपात खेळली जाणार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तथापि, टीम इंडियासमोर सर्वात मोठा प्रश्न उपकर्णधाराचा आहे की, या स्पर्धेत टीम इंडियाचा उपकर्णधार कोण असेल?
उपकर्णधार पदासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे नावही समोर येत आहे, परंतु बुमराह अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. इंग्लंडसोबत खेळलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत बुमराह फक्त ३ सामने खेळला. बुमराह आशिया कप २०२५ मध्ये खेळू शकत नाही अशीही बातमी आली होती.
Maharaja T20 Trophy 2025 : 6,6,6,6… मनीष पांडेचा मैदानावर धुमाकूळ! संघाला मिळवून दिला विजय
ताज्या रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराह पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया कप २०२५ मध्ये खेळणे निश्चित आहे. जर असे झाले तर बुमराहला पुन्हा एकदा टीम इंडियाचा उपकर्णधार बनवले जाऊ शकते. याशिवाय, बुमराहला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. बुमराह व्यतिरिक्त, शुभमन गिल आणि अक्षर पटेल यांनाही उपकर्णधारपदाचे दावेदार मानले जात आहे.
टीम इंडियाने शेवटची टी-२० मालिका इंग्लंडसोबत खेळली होती, ज्यामध्ये अक्षर पटेलने टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून भूमिका बजावली होती. श्रीलंकेसोबत खेळलेल्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले होते, तर शुभमन गिलला उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले होते.