फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध बांग्लादेश मालिका : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये १९ सप्टेंबरपासून २ मालिकांचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकांचे वेळापत्रक बऱ्याच दिवसांआधी जाहीर करण्यात आले होते. या मालिकेचे आयोजन भारतामध्ये करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशचा संघ पुढील आठवड्यात भारतात येणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिले २ कसोटी सामने आणि नंतर ३ T२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु आता सोशल मीडियावर या मालिकेला विरोध करण्यात येत आहे यामागचं कारण काय हे आज आम्ही तुम्हाला स्पष्ट करणार आहोत.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १९ ते २३ सप्टेंबर दरम्यान चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. यानंतर दुसरी कसोटी २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाईल. ७ ऑक्टोबरपासून T२० मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला T20 सामना ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. दुसरा T२० १० ऑक्टोबरला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आणि शेवटचा सा
बांगलादेशच्या भारत दौऱ्याआधीच संघाला मोठा विरोध सुरू झाला आहे. सोशल मीडियावर #BoycottBangladesh ट्रेंड करत आहे. बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हिंसक घटनांमुळे बांग्लादेशच्या भारत भेटीला विरोध होत आहे. बांगलादेशचा संघ भारतात येऊ नये, अशी युजर्सची इच्छा आहे. बांगलादेशच्या भारत भेटीला हिंदू महासभेनेही विरोध केला आहे. या मालिकेची दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे, जिथे या सामन्याला आधीच विरोध केला जात आहे.
पहिली कसोटी : १९ ते २३ सप्टेंबर, एमए चिदंबरम स्टेडियम
दुसरी कसोटी : २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर, ग्रीन पार्क- कानपूर
पहिला T20: ७ ऑक्टोबर, न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम, ग्वाल्हेर
दुसरा T20: १० ऑक्टोबर, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
तिसरा T20: १३ ऑक्टोबर, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद