फोटो सौजन्य - सोशल मिडिया
१५ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीचा सामना विराट कोहली याने खेळला, यामध्ये त्याने शतकही झळकावले. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही त्याच्या संघासाठी विजय हजारे ट्रॉफीचे सामने खेळताना पाहायला मिळाले, यावेळी दोन्ही दिग्गज खेळाडूंनी शतके झळकावली. १५ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीची सुरुवात चांगली झाली. आंध्रविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावून त्याने दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. चेस मास्टर विराट कोहलीने २९९ धावांचा पाठलाग करताना १३१ धावांची शानदार खेळी केली.
लिस्ट-ए क्रिकेटमधील कोहलीचे हे ५८ वे शतक होते, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० षटकांच्या फॉर्मेटमध्ये त्याचे ५३ शतके समाविष्ट आहेत. आता विराट कोहलीचे लक्ष सचिन तेंडुलकरच्या लिस्ट-ए मध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या ‘महान विक्रम’वर आहे. तुम्हाला सांगतो की, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरमध्ये आता फारसे अंतर राहिलेले नाही. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९ शतके झळकावली आहेत आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे, ५३८ डावांमध्ये ६० शतके झळकावली आहेत.
विराट कोहली आता त्याच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे, त्याने ३३० डावांमध्ये ५८ शतके केली आहेत. किंग कोहली सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून फक्त दोन शतके दूर आहे आणि त्याचा विश्वविक्रम मोडण्यापासून तीन शतके दूर आहे.रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर, त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. त्याने सिक्कीमविरुद्ध १५५ धावांची धमाकेदार खेळी केली. हे त्याच्या लिस्ट ए कारकिर्दीतील ३७ वे शतक होते.






