क्वेबेऱ्हा (दक्षिण आफ्रिका) : महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत (Women T-20 World Cup) भारतीय महिला संघाने (Indian women team) काल झालेल्या आयर्लंड (Ireland) विरोधाच्या सामन्यात पाच धावांनी विजय मिळवला आहे. मध्येच पाऊस पडला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 5 धावांनी विजयी घोषित केले. स्पर्धेतील भारताचा हा तिसरा विजय आहे, त्यामुळं भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय मिळवला. मात्र भारतीय संघाच्या मोहिमेस इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने धक्का बसला. मात्र आता भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
स्मृतीची धडाकेबाज खेळी…
भारतीय संघाने करा वा मरा सामन्यात आयर्लंडवर मात केली. भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी सामना जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ गड्यांच्या मोबदल्यात आयर्लंड टीमसमोर विजयासाठी १५६ धावांचे टार्गेट ठेवले होते. याला प्रतिउत्तर देताना आयर्लंडसंघाचे सुरुवातीलाचा दोन विकेट गेल्या. आयर्लंडचा संघ ८.२ षटकांत २ गडी गमावत ५४ धावांवर असतानाच पाऊस आला आणि खेळ थांबला. तो सुरू न होऊ शकल्याने भारताला विजयी घोषित केले. तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना १५६ धावा केल्या, यात स्मृती मानधनाच्या ८७ धावांच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने ६ गडी गमावत १५५ धावा केल्या.
पावसाचा फटका आयर्लंड संघाला…
पावसामुळे सामना थांबण्यापूर्वी ८.२ षटकांत २ बाद ५४ धावाच करता केल्या होत्या. ज्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंड संघ टीम इंडियाच्या ५ धावांनी मागे होता. याचाच फटका आयर्लंड संघाला बसला. अशा पद्धतीने भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाकडून स्मृती मंधानाने सर्वाधिक धावा केल्या. भारतासह अन्य दोन संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. यासह भारतीय महिला संघाने सलग तिसऱ्यांदा वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठली. या विजयामुळं भारतीय महिला संघाचे कौतुक होत आहे.






