केपटाऊन, दक्षिण आफ्रिका : महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत (Women T-20 World Cup) भारतीय महिला संघाने (Indian women team) साखळी सामन्यातील शेवटच्या सामन्यात आयर्लंडवर (Ireland) पाच धावांनी विजय मिळवला आहे. मध्येच पाऊस पडला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 5 धावांनी विजयी घोषित केले. आजपासून विश्वचषकातील उपांत्य फेरीतील सामन्यांना सुरुवात होत आहे. आज भारत विरुद्ध कांगारु (Australia) असा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. केपटाऊनमधील न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाचं अंतिम फेरीचं तिकिट बुक करण्याचा इऱादा आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा मागील पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळं आजचा सामना दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’ असा असणार आहे.
भारताला अंतिम सामन्यात पोहचण्याची संधी
गेल्या काही काळात भारताला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. विशेषत: नॉकआउट सामन्यात भारताचा पराभव झालाय. गेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत अंतिम फेरीत पोहोचला होता, तेथे ऑस्ट्रेलियाने पराभव केला. गेल्या पाच वर्षात भारतीय संघाचा जगातील अव्वल संघात समावेश होतो. मात्र त्यांना आतापर्यंत आयसीसीच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही. आता टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसीच्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे आणि विजेतेपद फक्त दोन पावलावर आहे. त्यामुळं आजचा सामना जिंकून टिम इंडियाला अंतिम सामन्यात पोहचण्याची संधी आहे.
फलंदाजी व गोलंदाजीत सुधारणा आवश्यक…
भारतीय संघाने करा वा मरा सामन्यात आयर्लंडवर मात केली. भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी सामना जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १५६ धावा केल्या, यात स्मृती मानधनाच्या ८७ धावांच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. फलंदाजीत स्मृती, रिचा घोष, जेमिमा यांच्या फलंदाजीत सातत्य आहे, मात्र कर्णधार हरमनप्रीत, शफाली यांना फलंदाजीत अपयश आले आहे. गोलंदाजीत रेणूका ठाकूरने चांगली गोलंदाजी केली आहे, पण तिला अन्य गोलंदाजांची साथ मिळत नाहीय, त्यामुळं भारताला गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल.
कांगारुचा बदला घेण्याची भारताला संधी
भारताला सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर या दोन गोष्टींवर अधिक फोकस करावा लागले. त्याच बरोबर भारतीय संघाला गेल्या वेळी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची ही मोठी संधी आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा या विश्वचषकात मागील पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळं आजचा सामना दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’ असा असणार आहे.
स्मृती रिचाची धडाकेबाज खेळी…
स्मृती मानंधना व रिचा घोष यांची धडाकेबाज फलंदाजी दिसून येत आहे. मागील दोन्ही सामन्यात स्मृतीने अर्धशतकी पार खेळली तर पाकिस्तान विरुद्ध रिचाने 32 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 44 धावांची खेळी केली. तर इंग्लंड विरुद्ध 34 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 सिक्समध्ये 47 धावांची खेळी केली. मात्र रिचा आयर्लंड विरुद्ध अपयशी ठरली. रिचा आयर्लंड विरुद्ध पहिल्याच बॉलवर आऊट झाली. दरम्यान रँकिंगमध्ये टीम इंडियाची स्मृति मंधाना (3) , शेफाली वर्मा (10), जेमिमाह रॉड्रिग्स (12), हरमनप्रीत कौर (13) आणि रिचा (20) असे एकूण 5 फलंदाज पहिल्या 20 मध्ये आहेत.
सामना कुठे व किती वाजता पाहता येणार…
टि-२० महिला विश्वचषकतील आजचा भारतीय महिलांचा उपांत्य फेरीचा सामना आहे. हा सामना द. आफ्रिकेतील केपटाऊन येथे खेळवला जाणार आहे. सामन्याची वेळ सायंकाळी ६.३० वाजता आहे. तर सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स १ हिंदी दिसेल. या सामन्याचं आयोजन हे केपटाऊनमधील न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाचं अंतिम फेरीत पोहण्याचा आणि ऑस्ट्रेलियाचा मागील पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे.
टीम इंडिया–
हरमनप्रीत कौर (कर्णधार), हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग आणि शिखा पांडे.
टीम ऑस्ट्रेलिया–
बेथ मूने, ग्रेस हॅरिस, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅनाबेल सुथरलँड, अशले गार्डनर, इलिस पेरी, हिथर ग्रॅहम, जेस जोनस्सेन, किम गार्थ, तहिला मॅग्राथ, अलिसा हीली, अलाना किंग, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वारेहम आणि मेगन स्कूट.






