फोटो सौजन्य - सोनी लिव्ह
जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताच्या संघाने आता खाते उघडले आहे. भारताच्या दोन्ही संघानी या चॅम्पियनशिप 2025 मध्ये दमदार सुरुवात केली आहे. मिक्स टीममध्ये भारताच्या संघाच्या हाती सिल्वर मेडल आले पण पुरुष संघाने पहिल्या राऊंडनंतर कमालीचा कमबॅक करुन गोल्ड मेडल नावावर केले. भारताच्या या पुरुष संघाने सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे. भारताच्या पुरुष संघाने या स्पर्धेमध्ये फ्रान्सच्या संघाला पराभुत करुन इतिहास रचला आहे.
7 सप्टेंबर रोजी रविवारी जागतिक तिरंगाजी चॅम्पियनशिप सामने सुरू आहेत. भारताच्या दोन संघ हे फायनल मध्ये पोहोचले होते. यामध्ये आता भारताच्या मिश्र जोडीने सिल्वर मेडल मिळवले आहेत तर पुरुषांने गोल्ड मेडल नावावर केले आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय पुरुष संघ रिषभ यादव, अमन सैनी आणि प्रथमेश फुगे या तिरंदाजांचा समावेश आहे तर या संघाने फायनल च्या सामन्यांमध्ये फ्रान्सच्या संघाला 235 233 असा पराभव करून सुवर्णपदक भारताच्या नावावर केले आहे.
THE INDIAN TRIO HAS CREATED HISTORY! 🤯
– Indian Men’s Compound Team beats France in the Final to clinch the World C’ship Title 🏆
FIRST EVER MEN’S TEAM TITLE FOR INDIA 🇮🇳💪 pic.twitter.com/83CiT6Z1ll
— The Khel India (@TheKhelIndia) September 7, 2025
रिषभ यादव, अमन सैनी आणि प्रथमेश फुगे हे तीनही तिरंदाज वैयक्तिक स्पर्धेमध्ये देखील सहभागी होणार आहेत त्यामुळे आता सर्वाच्या नजरा तिकडे टिकून आहेत. रिषभ यादव आणि ज्योती सुरेखा यांचा भारतीय मिश्र संघामध्ये समावेश होता. या जोडीचा फायनलच्या सामन्यांमध्ये नेदरलँड कडून पराभवाचा सामना करावा लागला. ज्योती आणि ऋषभ या दोघांना दोन पॉईंटने सिल्वर मेडलवर समाधान मानावे लागले.
भारताच्या तिरंदाजांमध्ये वैयक्तिक कंपाउंड महिला कॉलिफिकेशन राऊंडमध्ये ज्योती सुरेखा वेनम हे तिसऱ्या स्थानावर आहे. तर परणीत कौर ही 703 सह 11 व्या स्थानावर आहे. रितिका प्रदीप ही 690 44 सर्व स्थानावर आहे. भारताच्या प्रेक्षकांना ज्योती सुरेखा वेंनम हिच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पुरुष वयक्तिक स्पर्धेबद्दल सांगायचे झाले तर रिषभ यादव हा 709 सह आठव्या स्थानावर आहे. अमन सैनी हा 707 गुणांसह 15 व्या स्थानावर आहे.
🥈 Silver for India! 🏹🇮🇳
Congratulations to Jyothi Surekha Vennam & Rishabh Yadav on winning Silver in the Compound Mixed Team final at the #WorldArcheryChampionships 2025, Gwangju.
A stellar effort that makes India proud! ✨💪#ArcheryIndia #TeamIndia #NTPC pic.twitter.com/53dO9l5mgR
— ARCHERY ASSOCIATION OF INDIA (@india_archery) September 7, 2025
भारताचा तिसरा तिरंदाज प्रथमेश फुगे हा 706 गुणांचा १९ व्या स्थानावर आहे. कंपाउंड मिक्स टीम आणि कंपाऊंड पुरुष संघ यांच्यामधील सामने झाले आहेत आता कंपाउंड पुरुष वैयक्तिक एलिमिनेशन सामने आज संध्याकाळी खेळवले जाणार आहेत. पुरुष वैयक्तिक इंडिव्हिजन एलिमिनेशन सामने हे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:45 मिनिटांनी सुरू होणार आहेत.