फोटो सौजन्य – X
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स लीग आजपासून म्हणजेच १८ जुलैपासून सुरू होत आहे. या लीगमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला खूप पूर्वी निरोप देणारे दिग्गज खेळाडू छाप पाडताना दिसतील. युवराज सिंग, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांची तुफानी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल, तर ब्रेट ली गोलंदाजीत त्याच्या वेगाच्या बळावर कहर करताना दिसेल. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात खेळला जाईल.
या लीगमध्ये भारतीय संघ युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. स्पर्धेत एकूण १५ लीग सामने खेळले जातील. यानंतर, टॉप फोरमध्ये पोहोचणाऱ्या संघांमध्ये दोन सेमीफायनल सामने खेळले जातील. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सचा जेतेपदाचा सामना २ ऑगस्ट रोजी खेळला जाईल.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स आजपासून, म्हणजे १८ जुलैपासून सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडचा सामना इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी शाहिद आफ्रिदीकडे सोपवण्यात आली आहे. दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल.
टीम इंडिया २० जुलै रोजी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. युवराज सिंग भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. भारतीय संघातून सुरेश रैना, शिखर धवन, रॉबिन उथप्पा, युसूफ पठाण असे खेळाडू फलंदाजीने धमाकेदार कामगिरी करताना दिसतील. तर हरभजन सिंग, इरफान पठाण, पियुष चावला, विनय कुमार आणि वरुण आरोन हे गोलंदाजीत धुमाकूळ घालताना दिसतील.
🚨 CAPTAIN’s IN WCL 2025 🚨
South Africa – AB De Villiers.
India – Yuvraj Singh.
West Indies – Chris Gayle.
Australia – Brett Lee.
England – Eoin Morgan.
Pakistan – Shahid Afridi. pic.twitter.com/IBpL7LOPq2— Johns. (@CricCrazyJohns) July 18, 2025
भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानशी होईल. त्यानंतर युवराजच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया २२ जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेशी सामना करताना दिसेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया २६ जुलै रोजी हेडिंग्ले येथे आमनेसामने येतील. २७ जुलै रोजी भारतीय संघ इंग्लंडशी सामना करेल, तर शेवटच्या साखळी सामन्यात २९ जुलै रोजी वेस्ट इंडिजशी सामना करेल.
तारिख | सामना | ठिकाण |
---|---|---|
१८ जुलै २०२५ | इंग्लंड चॅम्पियन विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन | बर्मिंगहॅम |
१९ जुलै २०२५ | वेस्ट इंडिज चॅम्पियन विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन | बर्मिंगहॅम |
१९ जुलै २०२५ | इंग्लंड चॅम्पियन विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन | बर्मिंगहॅम |
२० जुलै, २०२५ | भारत चॅम्पियन विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन | बर्मिंगहॅम |
२२ जुलै २०२५ | भारत चॅम्पियन विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन | नॉर्थम्प्टन |
२२ जुलै २०२५ | इंग्लंड चॅम्पियन विरुद्ध वेस्ट इंडिज चॅम्पियन | नॉर्थम्प्टन |
२३ जुलै २०२५ | ऑस्ट्रेलिया चॅम्पियन विरुद्ध वेस्ट इंडिज चॅम्पियन | नॉर्थम्प्टन |
२४ जुलै २०२५ | इंग्लंड चॅम्पियन विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन | लीसेस्टरशायर |
२५ जुलै २०२५ | पाकिस्तान चॅम्पियन विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन | लीसेस्टरशायर |
२६ जुलै २०२५ | भारत चॅम्पियन विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन | लीड्स |
२६ जुलै, २०२५ | पाकिस्तान चॅम्पियन विरुद्ध वेस्ट इंडिज चॅम्पियन | लीड्स |
२७ जुलै, २०२५ | दक्षिण आफ्रिका चॅम्पियन विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन | लीड्स |
२७ जुलै, २०२५ | भारत चॅम्पियन विरुद्ध इंग्लंड चॅम्पियन | लीड्स |
२९ जुलै २०२५ | ऑस्ट्रेलिया चॅम्पियन विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन | लीसेस्टरशायर |
२९ जुलै २०२५ | भारत चॅम्पियन विरुद्ध वेस्ट इंडिज चॅम्पियन | लीसेस्टरशायर |
३१ जुलै २०२५ | SF 1 Vs SF 4 | बर्मिंगहॅम |
३१ जुलै २०२५ | SF 2 Vs SF 3 | बर्मिंगहॅम |
२ ऑगस्ट २०२५ | फायनलिस्ट १ विरुद्ध फायनलिस्ट २ | बर्मिंगहॅम |