युवराज सिंग(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2026 : माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंगबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. तो आता क्रिकेटच्या जगात एक नवीन भूमिका साकारताना दिसण्याची शक्यता आहे. २०११ च्या विश्वचषकात मालिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आलेला युवराज सिंग २०२६ च्या आयपीएल हंगामात लखनौ सुपर जायंट्सचा मुख्य प्रशिक्षक होण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आली आहे. एका वृत्तानुसार, एलएसजी फ्रँचायझीचे मालक संजीव गोएंका भारतीय प्रशिक्षकाच्या शोधात असून युवराजचे नाव यादीत सर्वात वर असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : “जेव्हा मी टीम इंडियाचा मुख्य…”, ‘द वॉल’ राहुल द्रविडचे रोहित शर्माबद्दल मोठे विधान; वाचा सविस्तर
लखनौ सुपर जायंट्स ही आयपीएल २०२२ मध्ये सामील होणारी एक नवीन फ्रँचायझी आहे. हा संघ अजून देखील आयपीएलच्या त्यांच्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात आहे. संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाचे जस्टिन लँगर असून त्यांनी गेल्या हंगामात संघाचे नेतृत्व केले होते. तथापि, अलिकडच्या अहवालांनुसार, फ्रँचायझी आता कोचिंगमध्ये भारतीय अनुभव आणि क्रिकेटची स्थानिक समज यांना प्राधान्य देण्याच्या विचारात आहे. अशा परिस्थितीत, युवराज सिंगच्या नावाचा उदय संघाच्या भविष्यातील रणनीतीचे प्रतिबिंब दर्शवीत आहे. जर हा करार अंतिम झाला तर तो युवराजच्या कारकिर्दीतील एक नवीन इनिंग सुरू होणार आहे.
युवराज सिंगने अद्याप कोणत्याही संघासोबत प्रशिक्षक म्हणून भूमिका बाजावलेलीली नाही. तरी त्याचा क्रिकेटमधील अनुभव पाहता टो अतुलनीय असाच आहे. त्याने शुभमन गिल, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांच्यासह अनेक तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. युवराज सिंगच्या मार्गदर्शनाखाली, या खेळाडूंनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अपवादात्मक कामगिरीचे दर्शन घडवले आहे. त्याच्या प्रशिक्षण शैलीतून आत्मविश्वास, आक्रमकता आणि खेळाबद्दलची आवड हे मिश्रण दिसून येते.
युवराज सिंग हा आयपीएल संघाचे प्रशिक्षक म्हणून जोडण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखील गुजरात टायटन्स त्याला आशिष नेहराचा पर्याय म्हणून पाहत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या,यासोबतच दिल्ली कॅपिटल्सकडून देखील रिकी पॉन्टिंगचा पर्याय म्हणून युवराजच्या नावाची चर्चा करण्यात आली होती. वास्तवात नंतर ही माहिती अहवाल खोटी ठरली.
युवराज सिंगची आयपीएल कारकीर्द देखील शानदार राहिली आहे. तो पंजाब किंग्ज, पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या सहा वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळलेला आहे. त्याने १३२ आयपीएल सामन्यांमध्ये २,७५० धावा फटकावल्या आहेत. यामध्ये त्याने ३६ विकेट्स घेतल्या आहेत.






