फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विराट कोहली : भारताचा स्टार दिग्गज क्रिकेट खेळाडू विराट कोहली आज त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्याचे चाहते हे भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये आहेत. त्याचबरोबर त्याची गणना ही दिग्गज खेळाडूंमध्ये केली जाते. अनेक विरोधी संघाच्या गोलंदाजांचा जेव्हा विराट कोहली फलंदाजीसाठी येतो तेव्हा घाम गाळला जातो. क्रिकेट विश्वामध्ये अशा अनेक जोड्या आहेत त्या भारतीय क्रिकेट चाहत्यांना एकत्र खेळताना पाहायला आवडतात. यामध्ये सर्वात लोकप्रिय आणि मनोरंजक जोडी म्हणजेच किंग विराट कोहली आणि सिक्सर किंग युवराज सिंह या दोघांना एकत्र पाहायला भारतीय क्रिकेट चाहत्यांना फार आवडते. आता भारताच्या सिक्सर किंगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून किंग कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
युवराज सिंहने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून विराट कोहलीला त्याच्या ३६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. युवराज सिंहने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या मजेशीर व्हिडिओमध्ये सुरुवातीला विराट कोहली आणि युवराज सिंह गमतीशीर अंदाजामध्ये फोनवर बोलताना दिसत आहेत. त्यानंतर गाणे टाकून विराट कोहलीसोबतचे फोटो युवराज सिंहने शेअर केले आहेत. या पोस्टवर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “#KingKohli तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझे सर्वात मोठे पुनरागमन झाले आणि जग तुमच्या ठोस पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहे तुम्ही ते भूतकाळात केले आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही ते पुन्हा कराल देव आशीर्वाद देईल! खूप प्रेम”
Wishing you a very Happy Birthday #KingKohli! The greatest comebacks emerge from our setbacks and the world eagerly looks forward to your solid comeback 🔥 you’ve done it in the past and I’m sure you will do it yet again 💪🏻🙌🏻 God bless! lots of love ❤️ @imVkohli pic.twitter.com/wo9hrzUehq
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) November 5, 2024
भारतीय नियामक मंडळाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी विराट कोहलीचे फोटो लावले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ५३८ सामने २७१३४ धावा आणि अजूनही खेळत आहेत. त्यानंतर त्यांनी खाली लिहिले आहे की, २०११ विश्वचषक, २०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता, ICC पुरुष T20 विश्वचषक विजेता असे त्याच्या कामगिरीवर जोर टाकला आहे.
5⃣3⃣8⃣ intl. matches & counting 👌
2⃣7⃣1⃣3⃣4⃣ intl. runs & counting 🙌2⃣0⃣1⃣1⃣ ICC World Cup Winner 🏆
2⃣0⃣1⃣3⃣ ICC Champions Trophy Winner 🏆
2⃣0⃣2⃣4⃣ ICC Men’s T20 World Cup Winner 🏆Here’s wishing Virat Kohli – Former #TeamIndia Captain & one of the finest batters – a very… pic.twitter.com/gh4p3EFCO9
— BCCI (@BCCI) November 5, 2024
भारताच्या संघाने गमावलेल्या सामन्यांमध्ये बऱ्याचदा विराट कोहली टीम इंडियाला सामने जिंकवून दिले आहेत. त्याचबरोबर भारताच्या संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवला होता, विराट कोहलीची गणना ही एका यशस्वी कर्णधारमध्ये केली जाते.