Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत…
नेमकं काय घडलं?
शनिवारी संध्याकाळी फर्ग्युसन कॉलेज रोडवर नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होती. अशातच एक पीएमपीएमएल बस अचानक अत्यंत वेगात आणि वेड्यावाकड्या पद्धतीने धावू लागल्याने लोकांचे लक्ष गेले. ही बस चालवणारी व्यक्ती मद्याच्या नशेत तर होतीच, पण तिला बसवर कोणतेही नियंत्रण राखता येत नव्हते. बसने रस्त्यावरील अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अत्यंत धोकादायक पद्धतीने कट मारले. काही वाहनांना त्याने थेट धडक देण्याचाही प्रयत्न केला. हा सगळा प्रकार पाहून पादचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी बाजूला धाव घेतली.
बसचा वेग आणि ड्रायव्हरची वर्तणूक पाहून हा ड्रायवर नसल्याचा संशय काही नागरिकांना आला. त्यांनी धाडस दाखवून बस अडवली आणि चालकाच्या केबिनमध्ये बसलेल्या व्यक्तीला खाली खेचले. मद्यधुंद अवस्थेत त्याने बस चोरल्याचे लोकांच्या लक्षात आले. तेथील नागिरकांनी या तरुणाला रस्त्यावरच चांगलाच चोप दिला. यावेळी तिथे मोठी गर्दी जमली आणि काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
पोलीस तपास सुरु
या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जमावाला शांत करून संबंधित मध्यधुंद तरुणाला आपल्या ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली असता, हा तरुण पीएमपीएमएलचा कर्मचारी किंवा चालक नसून एक सामान्य नागरिक आहे. मद्यधुंद अवस्थेत त्याने कुठूनतरी उभी असलेली रिकामी बस चोरली आणि ती थेट फर्ग्युसन कॉलेज रोडवर आणली. पीएमपीएमएल प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून बस नक्की कुठून आणि कशी चोरीला गेली, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा सामान्य नागरिकांची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस या घटनेची सखोल तपासणी करत आहे.
महाराष्ट्रात कायद्याचे पालन करणे ठरला गुन्हा? ‘त्या’ अधिकाऱ्यांवर FIR दाखल; जळगावचे प्रकरण काय?
Ans: पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज (FC) रोडवर.
Ans: मद्यधुंद अवस्थेत PMPML बस चोरून बेदरकार चालवली.
Ans: नागरिकांनी बस थांबवून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.






