बनावट ट्रेडिंग App कसे ओळखाल (फोटो सौजन्य - iStock)
यंदा बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे होणाऱ्या फसवणुकींमध्ये मोठी वाढ झाली आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) यांसारख्या नियामक संस्था गुंतवणूकदारांना जागरूकता कार्यक्रमांद्वारे सतत सावध करत आहेत. वृत्तवाहिन्याही या इशाऱ्यांबरोबरच अशी फसवणूण कशी घडते याची माहिती देत आहेत. असे असतानाही अनेक जण आपली कष्टाची कमाई गमावत आहेत.
याविषयी शेअर.मार्केट (Phone Pay Wealth) चे हेड ऑफ इंजिनिअरिंग हिमांशु साहू यांनी सांगितले की, ही फसवणूक काही एखाद-दुसऱ्या घटनांपुरती मर्यादित नाही. उदाहरणार्थ 2025 मध्ये बनावट ट्रेडिंग ॲपमुळे हैदराबादमधील एका व्यावसायिकाची तब्बल रुपये 3.24 कोटींची फसवणूक झाली, तर ठाण्यातील एका व्यक्तीला ट्रेडिंग स्कॅममध्ये रुपये 4.11 कोटींना लुटण्यात आले. कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा अशा कारवायांवर कठोर कारवाई करत आहेत. अनेकांना अटकही झाली आहे आणि बेकायदेशीर खाती गोठवण्यात आली आहेत, पण अशा प्रकारची फसवणूक सुरूच आहे.
नियामक संस्था आणि अधिकृत यंत्रणा आपले काम करत असल्या तरी, स्वतःचे संरक्षण कसे करावे हे आपल्यालाही माहीत असणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपण आपला बचाव कसा करू शकतो, हे आपण समजून घेऊ या.
ही फसवणूक कशी होते?
फसवणुकीचा प्रकार साधारण पुढीलप्रमाणे असतो –
Gmail Tips: फक्त एक क्लिक आणि होत्याच होईल नव्हतं! ‘या’ Scam पासून स्वतःचा बचाव कसा कराल?
नक्की काय तपासावे?
कोणत्याही ट्रेडिंग ॲप किंवा प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवण्यापूर्वी पुढील पाच बाबी तपासाव्या :
WhatsApp ने Apple वापरकर्त्यांसाठी एक खास अपडेट जारी केले, जाणून घ्या नवीन अपडेट काय?
स्कॅम-प्रूफ चेकलिस्ट कशी असावी?
स्वतःचे संरक्षण कसे करायचे हे आता आपण समजून घेतले आहे, ही आहे तुमची स्कॅम-प्रूफ चेकलिस्ट :
तात्पर्य, जर एखादे इन्व्हेस्टमेंट ॲप कमी वेळेत जास्त परतावा देण्याचे आश्वासन देत असेल, एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक खात्यात पेमेंट करायला सांगत असेल किंवा ॲप एखाद्या अनोळखी ग्रुपमधून तुमच्या इनबॉक्समध्ये आले असेल, तर ते इन्व्हेस्टमेंट नाही तर तो एक सापळा असतो! अशा प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक न करणेच हिताचे राहील.