फोटो सौजन्य: iStock
ऑफिसच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात Gmail चा वापर होत असतो. एवढेच काय तर एखादा नवीन फोन घेतल्यावर देखील त्यातील गूगल सर्व्हिस चालू करण्यासाठी Gmail अकॉऊंट बनवावे लागते. हेच जीमेल अकाउंट पुढे इतर गूगल ॲप्ससोबत लिंक होते. मात्र, हल्ली जीमेल द्वारे देखील वापरकर्त्यांसोबत स्कॅम होत आहेत. त्यामुळेच तर Google ने जीमेल वापरकर्त्यांना AI मुळे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांबद्दल इशारा दिला आहे.
आजकाल AI ने अनेक कामे सोपी केली आहेत, चांगल्या पद्धतीने ईमेल लिहिण्यापासून ते विशिष्ट वापरकर्त्याला लक्ष्य करण्यापर्यंत, आज AI चा वापर प्रत्येक क्षेत्रात होताना दिसत आहे. अलीकडेच गुगलने Gmail वापरकर्त्यांना एआयमुळे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांबद्दल सतर्क केले आहे. अनेकदा वापरकर्ते गुगल सपोर्ट एक्झिक्युटिव्ह आणि फॉलो-अप ईमेलद्वारे देखील गोंधळलेले असतात. अशातच आज आपण स्कॅम ईमेल टाळण्याचे काही सोपे मार्ग जाणून घेऊयात.
YouTube वरील कमाईचा नवा मार्ग खुला, ‘हे’ फीचर क्रिएटर्सना बनवणार मालामाल
AI द्वारे खऱ्या वाटणाऱ्या इमेज किंवा कंटेन्ट तयार करून तुमची दिशाभूल होऊ शकते, म्हणून तुम्ही अचानक पाठवलेल्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणे टाळावे. पडताळणीसाठी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधणे केव्हाही चांगले.
जर तुम्हाला तुमच्या माहितीशिवाय खरेदीशी संबंधित ईमेल मिळला आणि त्यात लिहिले जर असे लिहिले असेल की तुम्ही अचानक ऑर्डर रद्द केली, तर स्कॅमर तुम्हाला टेक सपोर्टच्या नावाखाली गोंधळात टाकू शकतात आणि क्रेडिट कार्ड नंबर विचारण्याची आणि पीसीशी कनेक्ट करण्याची विनंती करू शकतात. अशा परिस्थितीत, तुम्ही ईमेल तपासावा आणि त्यासोबतच पिन कोड, डिलिव्हरी नंबर, इनव्हॉइस इत्यादी माहिती गोळा करावी.
काय सांगता! WhatsApp वर आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठीही करता येणार अर्ज, ‘या’ शहरात सुरू होणार सेवा
जर कोणी ईमेलद्वारे दावा केला की तुम्ही अश्लील कंटेन्ट किंवा आक्षेपार्ह व्हिडिओ पाहिले आहेत आणि पैसे मागितले आहेत, तसेच तुमच्या घराचा पत्ता, फोटो आणि पासवर्ड असल्याचा दावा केला तर हा एक प्रकारचा ईमेल स्पूफिंग असू शकतो.