Apple WWDC 2026: हॅकर्सपासून मिळणार अधिक सुरक्षा! Apple चे नवे AI टूल स्वत:च बदलणार तुमचा पासवर्ड... कसं काम करेल हे नवं फीचर?
असे काही स्मार्टफोन यूजर असतात, ज्यांना वारंवार पासवर्ड बदलण्याचा कंटाळा येतो. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी आहात का? तुम्ही देखील तुमचा एखादा पासवर्ड धोक्यात आल्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करता का? तुम्ही देखील गोपनीयतेचे नेहमीचे नियम विसरता का? तर अॅपलने सादर केलेले नवीन फीचर नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. हे फीचर स्वत:हून कमकुवत, वारंवार वापरले जाणारे आणि कॉम्प्रोमाइज्ड पासवर्ड बदलणार आहे. अशा परिस्थितीत डेटा लीक किंवा ब्रीच सारख्या घटना घडल्यास यूजर्सना स्वत: अकाऊंट्सचे पासवर्ड बदलण्याची गरज पडणार नाही. हे नवीन टूल आपोआप तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड बदलणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
iOS 27 अपडेटसह पासवर्ड अॅपमध्ये हे नवीन फीचर आणत आहे. अॅपलचं असं म्हणणं आहे की, जेव्हा एखादा पासवर्ड धोक्यात आल्याचे किंला लीक झाल्याचे सांगितलं जाईल, अशावेळी पासवर्ड अॅप स्वत: सपोर्टेड वेबसाईटवर पासवर्ड अपडेट करून सेव्ह करणार आहे. याचा अर्थ असा आहे की, नव्या अपडेटनंतर पासवर्ड अॅप यूजर्सना केवळ कमकुवत किंवा लीक झालेल्या पासवर्डबाबत वॉर्निंग देणार नाही तर हे टूल अॅपल इंटेलिजेंसच्या मदतीने स्वत: पासवर्ड रिसेट करणार आहे. हे फीचर अशा लोकांसाठी अतिशय फायद्याचं ठरणार आहे, जे डेटा ब्रीचसारख्या घटनांनंतर देखील त्यांचा पासवर्ड बदलत नाहीत.
जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर तुम्हाला माहिती असेल की, पासवर्ड अॅपमध्ये लॉग-इन क्रेडेंशियल्स, पासकी, टू-फॅक्टर ऑथेंटिकेश, वायफाय पासवर्ड आणि सिक्योरिटी अलर्ट्स इत्यादी स्टोअर केले जातात. आतापर्यंत जेव्हा यूजर्स कमकुवत पासवर्ड्स आणि वेगवेगळ्या सर्विसवर एकसारखे पासवर्ड वापरल्यास यूजर्सना नोटिफाय करत होती. मात्र आता नव्या अपडेटमध्ये हे टूल अधिक पावरफुल झाले आहे. आयओएस 27 अपडेटनंतर हे अॅपल इंटेलिजेंसच्या मदतीने स्वत: वेबसाईटवर डाऊन अकाऊंटमध्ये साईन करेल आणि स्वत: मजबूत पासवर्ड सेट करणार आहे. त्यानंतर हा पासवर्ड पासवर्ड अॅपमध्ये स्टोअर देखील केला जाणार आहे.
AI क्रांती की संकट? मशीन्सवरचं मानवी नियंत्रण संपणार? तज्ज्ञांच्या इशाऱ्याने जगभरात वाढली चिंता
अॅपलने सादर केलेलं नवीन फीचर फायद्याचं असलं तरी देखील याबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे. एआय सिस्टिमला पासवर्डचा अॅक्सेस देणं खरंच सुरक्षित आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याबाबत कंपनीने सांगितलं आहे की, पासवर्ड टूल प्राइवेट क्लाउड कंप्यूट इंफ्रास्ट्रक्चरचा वापर करणार आहे. ॲपलने विशेषतः एआयला डोळ्यासमोर ठेवून, गोपनीयतेच्या उद्देशाने याची रचना केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, पासवर्ड बदलण्याची प्रोसेस एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असणार आहे आणि यामध्ये कोणतीही वैयक्तिक माहिती स्टोअर केली जाणार नाही.






