Apple WWDC 2026: टेक कंपनीने सादर केला नवा iOS 27! तुमच्या iPhone ला मिळणार का लेटेस्ट अपडेट? वाचा यादी
GTA 6 खेळण्याचे तुमचेही स्वप्न राहू शकते अपूर्ण! ‘या’ कारणामुळे लाखो गेमर्स होणार निराश
iOS 27 मध्ये कंपनीने लिक्विड ग्लास डिझाईनमध्ये सुधारणा केली आहे. यासोबतच परफॉर्मंस देखील बूस्ट केला आहे. आयओएस 26 च्या तुलनेत फोटो 70 टक्के आणि अॅप्स 30 टक्के वेगाने लोड होणार आहेत. तसेच एयरड्रॉपने फाईल्स शेअर करण्याचे काम देखील 80 टक्के वेगाने पूर्ण केले जाणार आहे. तसेच, वायाफाय आणि सेल्युलर नेटवर्क स्विच करणं देखील अधिक सोपं होणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, परफॉर्मंस अधिक सुधारण्यासाठी CPU शेड्यूल दिले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
These are the devices compatible with iOS 27 🚨 pic.twitter.com/5P06YlP1BU — Apple Hub (@theapplehub) June 8, 2026
आयफोनच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिममध्ये कंपनीने अनेक एआय फीचर्स देखील जोडले आहेत. यामधील सर्वात खास फीचर आहे, सिरी एआय असिस्टंट. सिरी एआय असिस्टंट अॅपलच्या फाउंडेशन मॉडेल आणि गूगलच्या जेमिनी एआय मॉडेलच्या कॉम्बिनेशनने तयार करण्यात आले आहे. कंपनीने सिरीचे एक वेगळे अॅप देखील लाँच केले आहे. ज्यामध्ये सिरीसोबत केलेले संभाषण पुन्हा पाहू शकता.
कंपनीने अॅपल इंटेलिजेंससाठी देखील काही महत्त्वपूर्ण अपडेट्स जारी केले आहेत. आता सफारी, वॉलेट, फोटो आणि दूसऱ्या अॅप्समध्ये देखील आयओएस 27 सह अॅपल इंटेलिजेंस सपोर्ट देखील मिळणार आहे. यासोबतच एआयच्या मदतीने फोटो एडीट करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे. यूजर्स फोटोमधील ऑब्जेक्ट रिफ्रेम करू शकणार आहेत.
कॅमेऱ्यावर लाँग प्रेस केल्यास यूजर्स अॅपलचे विजुअल इंटेलिजेंस फीचर वापरू शकणार आहेत. हे फीचर आयफोन 15 प्रो सिरीजपासून उपलब्ध असणार आहे. तसेच यूजर्सना सिरीचा आवाज कस्टमाइज करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे. आयओएस 27 मध्ये, यूजर्स फोन ॲप आणि मेल ॲपमधून महत्त्वाची माहिती शोधू शकतील. सफारी ॲपमधील टेबल्सचे विषयानुसार गट तयार केले जातील. अॅपलने नव्या सॉफ्टवेअरसह पॅरेंटल कंट्रोल फीचर देखील जोडले आहे, ज्यामध्ये टाइम अलाउंट आणि शेड्यूल सारख्या गोष्टींचा समावेश आहे. हे फीचर्स iOS 27, iPadOS 27, आणि macOS 27 मध्ये देखील पाहायला मिळणार आहेत.
The new Siri AI in iOS 27 is incredible 🔥 pic.twitter.com/EPEfUdpwf2 — Apple Hub (@theapplehub) June 9, 2026
WWDC कीनोट ईव्हेंटमध्ये कंपनीने सांगितलं आहे की, डेव्हलपर्ससाठी अपडेट उपलब्ध झाले आहे. इतर यूजर्ससाठी नवीन सॉफ्टवेअर सप्टेंबरमध्ये लेटेस्ट आयफोन सीरीजसह रिलीज केले जाऊ शकते. तसेच कंपनी लवकरच आयफोन 15 प्रो आणि त्यानंतर रिलीज झालेल्या डिव्हाईससाठी अॅपल इंटेलिजेंस फीचर्स रिलीज करू शकते. कंपनी सध्या ईयू आणि चीनमध्ये हे फीचर रिलीज करणार नाही.
जुना Smartphone विकताय? सर्वात आधी आवर्जून करा ही 4 कामं; नाहीतर वैयक्तिक डेटा होऊ शकतो लीक
आयफोन 11 आणि त्यानंतर लाँच झालेल्या आयफोन मॉडेल्ससाठी आयओएस 27 चा सपोर्ट रिलीज केला जाणार आहे. आयफोन 11 पासून आयफोन 16 सिरीजपर्यंतच्या मॉडेल्ससाठी लेटेस्ट सॉफ्टवेयर अपडेट रिलीज केलं जाणार आहे.
Ans: iOS हे अॅपलच्या आयफोनसाठी विकसित केलेले मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे.
Ans: iOS मुख्यतः आयफोनमध्ये वापरले जाते.
Ans: iOS हे अॅपलचे बंद इकोसिस्टम असलेले ऑपरेटिंग सिस्टम आहे, तर Android हे विविध कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये वापरले जाते.






