BSNL Recharge Plan: कंपनीला समजली यूजर्सची व्यथा! स्वस्तात लाँच केला संपूर्ण वर्षभराचा प्लॅन; दररोज 3GB डेटासह मिळणार 'हे' फायदे
250 वर्षांसाठी जमिनीत पुरलं टाइम कॅप्सूल! आतमध्ये ठेवलाय iPhone 17 Pro Max, 2276 मध्येही होणार सुरु?
कंपनीने एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सावधान: दररोज 3 जीबी डेटामुळे ‘रील्स’चा अतिवापर होऊ शकतो (Warning: 3GB/Day May Cause Excessive Reels Consumption). याचा अर्थ असा आहे की, जर तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा मिळाला, तर सोशल मीडिया पाहण्यासाठी तुम्ही गरजेपेक्षा जास्त वेळ घेऊ शकता. खरं तर हा केवळ एक मजेदार मेसेज आहे, जो यूजर्सना आकर्षित करण्यासाठी लिहीला आहे. जास्तीचा डेटा आणि संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडीटी… रिचार्ज प्लॅनच्या या फायद्यांकडे यूजर्सचं लक्ष वेधून घेण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. या नव्या प्लॅनची किंमत किती आहे आणि हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना कोणते फायदे मिळणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
Aaj Recharge Karo. Agla Reminder Agle Saal Aayega Recharge smart via #BReX
👉 https://t.co/41wNbHpifE#BSNLIndia #StayConnected #InternetForEveryone #DigitalLife #IndiaOnline #BSNLServices #SmartIndia #EverydayConnectivity #2799plan #connectivity @CMDBSNL @robertravi21 pic.twitter.com/G76srL9QS9 — BSNL India (@BSNLCorporate) July 2, 2026
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 2,799 रुपये आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 365 दिवसांची म्हणजेच संपूर्ण एका वर्षाची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच, या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 3GB हाय-स्पीड डेटा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 100 एसएमएस मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षभरात एकूण 1,095GB डेटा ऑफर केला जाणार आहे.
डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होणार आहे. त्यामुळे ज्या यूजर्सना जास्त डेटाची गरज आहे किंवा ज्या यूजर्सना वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो, अशा यूजर्ससाठी कंपनीचा 2,799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन एक चांगला पर्याय ठरणार आहे. जर तुम्ही इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब वीडियो, ओटीटी कंटेंट किंवा ऑनलाईन गेमिंगमध्ये जास्त वेळ घालवत असाल तर तुम्हाला नक्कीच जास्त डेटाची आवश्यकता असणार आहे. अशावेळी तुम्ही हा रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकता. यामुळे तुम्हाला संपूर्ण वर्षभर रिचार्जची चिंता करण्याची गरज भासणार नाही.






