250 वर्षांसाठी जमिनीत पुरलं टाइम कॅप्सूल! आतमध्ये ठेवलाय iPhone 17 Pro Max, 2276 मध्येही होणार सुरु?
Apple ने अचानक का बंद केले लेदर iPhone Cases? काय आहे कारण? वाचून तुम्हीही व्हाल हैराण
4 जुलै 2026 रोजी स्वातंत्र्याचे 250 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अमेरिकेने फिलाडेल्फियामध्ये 900 पाउंड म्हणजेच सुमारे 408 किलोचे एक अतिशय मजबूत स्टेनलेस स्टील टाइम कॅप्सूल जमीनमध्ये पुरले आहे. आता हे टाइम कॅप्सूल थेट 250 वर्षांनी म्हणजेच 2276 मध्ये ओपन केले जाणार आहे. सर्वात विशेष म्हणजेच या टाईम कॅप्सूलमध्ये आजचा सर्वात ॲडव्हांस स्मार्टफोन आयफोन 17 प्रो मॅक्स (ऑरेंज) ठेवला आहे. (फोटो सौजन्य: X)
कॅप्सूलमध्ये आयफोन ठेवण्यामागे एक खास कारण आहे. आयफोनच्या नोट्स ॲपमध्ये 2026 या वर्षातील रोजच्या जीवनासंबंधित अनेक डिजिटल आर्टिफॅक्ट्स म्हणजेच फोटोज, नोट्स आणि दुसऱ्या गोष्टी लिहील्या आहेत. आयोजकांचे असे मत आहे की, आजच्या काळात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. हीच गोष्ट भविष्यातील लोकांना सांगायची असेल तर हा प्रयोग अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो.
अमेरिकेतील हा प्रयोग सध्या सर्वत्र चर्चेत असून अनेकांनी एकच प्रश्न उपस्थित केला आहे की, जेव्हा 2276 मध्ये टाईम कॅप्सूल ओपन केले जाईल, तेव्हा आयफोन सुरु होईल का? तज्ज्ञांचे असे मत आहे की, 2276 मध्ये टाईम कॅप्सूल ओपन केल्यानंतर आयफोन सुरु होण्याची शक्यता फार कमी आहे. याचे कारण म्हणजे आयफोनमध्ये लिथियम-आयनचा वापर केला जातो, जो वेळेनुसार पूर्णपणे खराब होतो. मात्र जर भविष्यातील माणसांनी काही जुगाड करून किंवा नवीन टेक्नोलॉजीचा वापर करून आयफोन चालू करण्यात यश मिळवले, तर त्यांना 250 वर्षांपूर्वींचे फोटो आणि नोट्स पाहायला मिळू शकतात. आजच्या काळापेक्षा म्हणजेच 2026 पेक्षा 2276 चे जग किती वेगळ असेल याचा अंदाज लावणं फार कठीण आहे.
जमिनीत पुरलेल्या या कॅप्सुलमध्ये केवळ आयफोनचं नाही तर एक आर्काइवल पेपर प्रिंट करून ठेवण्यात आला आहे. कॅलिफोर्निया राज्याने अँथ्रोपिकच्या ‘क्लाउड’ नावाच्या एआय टूलला एक भविष्यवाणी लिहिण्याचे काम दिले, जी न खराब होणाऱ्या संग्रहित कागदावर छापून कॅप्सूलमध्ये ठेवण्यात आली. या एआय भविष्यवाणीनुसार, 250 वर्षांत महामार्ग नाहीसे होतील आणि कॅलिफोर्निया, ओरेगॉन, वॉशिंग्टन व ब्रिटिश कोलंबिया एकत्र येऊन पॅसिफिक फेडरेशनची स्थापना करतील.
या कॅप्सूलमध्ये ठेवलेल्या एका स्टीलच्या नाण्यावर अमेरिकेचे संपूर्ण संविधान आणि स्वातंत्र्याचे घोषणापत्र लिहीले आहे. यासोबतच न्यू हॅम्पशायरने त्यांच्या क्रांती युद्धाच्या इतिहासाची माहिती देणारे एक माहितीपत्रकही पाठवले आहे. ही टाइम कॅप्सूल दाबली जाऊन फुटू नये म्हणून दंडगोलाकार आहे. तसेच, पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी तिला इन्सुलेशनचा दुहेरी थर आहे. भविष्यातील लोकांना ही टाईम कॅप्सूल शोधण्यासाठी मदत मिळावी, यासाठी नॅशनल पार्क सर्विसच्या प्लॅनमध्ये याची माहिती जोडण्यात आली आहे आणि कॅप्सूल पुरण्यात आलेल्या ठिकाणी एक खास दगड देखील लावण्यात आला आहे.






