फोटो सौजन्य - Social Media
भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने ग्राहकांसाठी मोठी ऑफर जाहीर केली आहे. उत्सवी हंगाम लक्षात घेऊन कंपनीने निवडक गॅलेक्सी स्मार्टफोन्सवर खास किमतींची घोषणा केली असून, ग्राहकांना प्रीमियम स्मार्टफोन अत्यंत कमी दरात मिळणार आहेत.
सॅमसंगने स्पष्ट केले की, या सेलमुळे ग्राहकांना लाँच झाल्यापासूनच्या सर्वात आकर्षक दरांमध्ये फोन खरेदी करता येतील. तसेच या गॅलेक्सी सीरिजमध्ये दिलेले एआय-आधारित फीचर्स वापरकर्त्यांचा अनुभव अधिक सहज, सर्जनशील आणि उत्पादक बनवतील. गॅलेक्सी एस२४ अल्ट्रा हा भारतातील सर्वाधिक विक्री होणारा प्रीमियम स्मार्टफोन ठरला असून, त्याची मूळ किंमत ₹१,२९,९९९ आहे. मात्र फेस्टिव्ह सेलदरम्यान हा फोन फक्त ₹७१,९९९ मध्ये मिळणार आहे. गॅलेक्सी एस२४ स्नॅपड्रॅगन ८ जन ३ प्रोसेसरसह ₹३९,९९९ मध्ये तर एस२४ एफई फक्त ₹२९,९९९ मध्ये उपलब्ध असेल.
मिड-रेंज सेगमेंटमध्येही आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत. गॅलेक्सी ए५५ ५जी फक्त ₹२३,९९९ आणि गॅलेक्सी ए३५ ५जी फक्त ₹१७,९९९ मध्ये उपलब्ध आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये ६.६ इंच सुपर एएमओएलईडी डिस्प्ले, ५० मेगापिक्सल कॅमेरा, डॉल्बी स्पीकर्स आणि नाइटोग्राफी तंत्रज्ञान दिलेले आहे. बजेट सेगमेंटमधील लोकप्रिय एम सीरिज आणि एफ सीरिजमध्येही मोठ्या सवलती जाहीर झाल्या आहेत. गॅलेक्सी एम३६ ५जी ₹१३,९९९, एम१६ ५जी ₹१०,४९९, तर एम०६ ५जी फक्त ₹७,४९९ मध्ये उपलब्ध असेल. त्याचबरोबर एफ३६ ५जी ₹१३,९९९ आणि एफ०६ ५जी फक्त ₹७,४९९ मध्ये मिळणार आहे.
ही ऑफर्स २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होत असून, ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्समध्ये या किमतींमध्ये खरेदी करता येईल. जर तुम्ही या सणासुदींच्या दिवसांत स्मार्टफोन खरेदी करू इच्छूक आहात तर नक्कीच या आॅफरचा लाभ घेणे चांगला पर्याय ठरण्याची शक्यता आहे. या दिवसात तुम्ही चांगल्या किफायतशीर आॅफरचा लाभ घेत बचत करू पाहत आहात तर वाट कसली पाहताय? या संधीचा लाभ घ्या.