Redeem Codes For Today: Free Fire प्लेअर्ससाठी आले नवे रिडीम कोड, प्रीमियम स्किन फ्रीमध्ये मिळवण्याची सुवर्ण संधी
फ्री फायर मॅक्सच्या रिडीम कोडची सर्वाधिक मागणी आहे. सर्व गेमर या कोडची वाट पाहत असतात, कारण ते रिडीम करून, वेपन स्किन, बंडल, आउटफिट, पेट, कॅरेक्टर, इमोट आणि लूट क्रेट्स सारख्या वस्तू मिळवता येतात. यासाठी तुम्हाला तुमच्याकडे असलेले डायमंड खर्च करण्याची देखील गरज नसते. तुम्हाला केवळ गेममध्ये तुमचा रिडीम कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला वेपन स्किन, बंडल, आउटफिट, पेट, कॅरेक्टर, इमोट आणि लूट क्रेट्स यासारख्या वस्तू मिळणार आहेत. हे विशेष कोड गेमिंग अनुभव वाढवतात आणि गेमर्सना प्रीमियम आणि विशेष वस्तू मिळविण्याची संधी देतात.
iOS 19 Update: तुमच्या आरोग्याची काळजी घेणार Apple चा AI डॉक्टर, Health App मध्ये मिळणार नवीन फीचर्स
गेम डेव्हलपर गॅरेना दररोज फ्री फायर मॅक्स रिडीम कोड घेऊन येत असतात. हे कोड संख्या आणि अक्षरे असे मिश्रण असते. त्यांची संख्या 16 अंकांपर्यंत आहे. हे पहिल्या 500 गेमर्ससाठी उपलब्ध आहेत आणि फक्त एकदाच रिडीम केले जाऊ शकतात. या बातमीत, आम्ही तुम्हाला आजचा म्हणजेच 2 एप्रिल 2025 चा कोड सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्समध्ये उपलब्ध असलेल्या महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक म्हणजे वेपन स्किन. या स्किन बंदुकीची शक्ती वाढवतात. तसेच, शस्त्राला एक क्लासी लूक मिळतो. ही स्कीन मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे असलेले डायमंड खर्च करावे लागतात. पण तुम्ही तुमच्याकडे असलेले डायमंड खर्च न करता देखील वेपन स्किन मिळवू शकता. फ्री फायर मॅक्समधील इव्हो व्हॉल्ट हा लक रॉयलचा एक गेमिंग इवेंट आहे जो पुढील 29 दिवसांसाठी गेमर्ससाठी लाईव्ह असेल. या काळात, वेपन स्किन जिंकता येतात. याशिवाय, बोनफायर, लक रॉयल व्हाउचर आणि आर्मर क्रेट सारख्या वस्तू मिळविण्याची संधी देखील असेल.
Poco च्या नवीन स्मार्टफोनची लाँच डेट कन्फर्म, या दिवशी भारतात करणार एंट्री! किंमत 7 हजारांहून कमी
गॅरेना फ्री फायर मॅक्सच्या विशेष गेमिंग इव्हेंटमध्ये स्पिन करण्यासाठी हिरे वापरावे लागतील . एकदा गेम स्पिन करण्यासाठी, तुम्हाला 20 हिरे खर्च करावे लागतील. त्याच वेळी, 10+1 म्हणजे 11 वेळा फिरवण्यासाठी 200 हिरे वापरावे लागतील.