(फोटो सौजन्य: Pinterest)
प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वे सातत्याने सुधारणा करत आहे. यासाठी रेल्वेने रिझर्वेशन तिकीट बुकिंग आणखी सोपे केले आहे. सध्या, बहुतेक रेल्वे प्रवासी भारतीय रेल्वेचे अधिकृत तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म IRCTC द्वारे आरक्षण तिकिटे बुक करतात. तुम्ही IRCTC वेबसाइट किंवा ॲपद्वारे बुक केलेली तिकिटे सहजपणे रद्द करू शकता आणि त्यांचा रिफंड मिळवू शकता. अशात जर एखाद्याने हे तिकीट ऑफलाईन खरेदी केले तर त्याला हे तिकीट कॅन्सल करता येईल का? उत्तर आहे, हो तुम्ही हे सहज आपल्या फोनमधून ऑनलाईन पद्धतीने करू शकता आणि तुमच्या कॅन्सल तिकिटाचा रिफंड देखील मिळवू शकता.
तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही रेल्वेच्या PRS काउंटरवरून तिकीट घेतले असेल, तर तुम्ही ते IRCTC वेबसाइट किंवा ॲपवरून ऑनलाइनही रद्द करू शकता. यासाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेब साईटला प्रथम भेट द्यावी लागेल. यांनतर तुम्ही येथे तिकीट कॅन्सलेशन प्रोसेस (Ticket Cancellation Process) करू शकता.
घरबसल्या असे बनवा E-Shram Card, दरमहा मिळेल 3000 रुपयांची पेन्शन
काउंटर तिकीट ऑनलाईन कसे रद्द करावे?
Samsung युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता जुन्या मॉडेलमधेही मिळणार Galaxy S25 सीरीज चे ॲडव्हान्स फिचर
कसे मिळणार रिफंड?
PRS काउंटरवरून घेतलेल्या तिकिटांचा परतावा मिळवण्यासाठी जवळच्या PRS काउंटरवर जावे लागेल. कॅन्सल केलेले तिकीट पीआरएस काउंटरवर जमा केल्यानंतरच तुम्हाला तिकिटाची रिफंड रक्कम मिळेल. लक्षात ठेवा की रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुम्ही कन्फर्म तिकीट कॅन्सल केले असेल, तर तुम्हाला पीआरएस काउंटरवर जाऊन ट्रेन सुटण्याच्या 4 तास आधी तिकीट जमा करावे लागेल. तर, वेटिंग लिस्ट किंवा RAC तिकीट कॅन्सल केल्यास, तुम्ही शेड्यूल डिपार्चरपासून 30 मिनिटे आधी PRS काउंटरवर तिकीट सबमिट करून त्याचा रिफंड मिळवू शकता.