केवळ 844 रुपयांत घरी घेऊन या Samsung Galaxy M35 5G, Amazon घेऊन आलीये आकर्षक डिल! जाणून घ्या सविस्तर
तुम्ही मिड-रेंज सेगमेंटमधील पावरफुल आणि फीचर-पॅक स्मार्टफोनच्या शोधात आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. सध्या तुमच्याकडे पैसे नसतील आणि तुम्हाला नवीन स्मार्टफोनची गरज असेल तर चिंता करू नका. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म एक अशी ऑफर घेऊन आला आहे, जिथे तुम्ही 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत Samsung Galaxy M35 5G घरी घेऊन येऊ शकता.
तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
Samsung Galaxy M35 5G स्मार्टफोन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कारण Galaxy M35 5G ची किंमत पुन्हा एकदा कमी झाली आहे. तुम्ही हा स्मार्टफोन केवळ 844 रुपयांच्या किंमतीत घरी घेऊन जाऊ शकता. Galaxy M35 5G गेल्या वर्षी लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनचा अपग्रेड व्हेरिअंट Galaxy M36 5G लाँच झाल्यानंतर जुन्या स्मार्टफोनची किंमत सतत कमी होत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
खरं तर Samsung Galaxy M35 5G स्मार्टफोन 24,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र डिस्काऊंट ऑफर्सनंतर या स्मार्टफोनची किंंमत 9,000 रुपयांनी कमी झाली आहे. एवढंच नाही तर हा स्मार्टफोन ईएमआयवर खरेदी करण्याची संधी देखील उपलब्ध आहे. डिस्काऊंट आणि ऑफर्सनंतर या स्मार्टफोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजवाला व्हेरिअंट 18,999 रुपयांच्या किंमतीत तर 8GB रॅम आणि 128GB मॉडल 16,499 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच या स्मार्टफोनचा टॉप व्हेरिअंट 26,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.
हा स्मार्टफोन मूनलाईट ब्लू, डेब्रेक ब्लू आणि थंडर ग्रे या रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर बँक डिस्काउंट, नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर सारखे अनेक फायदे दिले जातात. ग्राहक 8GB व्हेरिअंट 893 रुपये प्रति महिना नॉन-कॉस्ट EMI वर खरेदी करू शकतात.
स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर Galaxy M35 5G मध्ये 6.6 इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000 निट्स ब्राइटनेस ऑफर करतो. हा स्मार्टफोन सॅमसंगच्या Exynos 1380 प्रोसेसरवर आधारित आहे. या फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.
स्मार्टफोनमधील कॅमेरा देखील जबरदस्त आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 50MP ची मुख्य लेंस, 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो लेंस यांचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Samsung Galaxy M35 5G मध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Galaxy M35 5G हा Android 14 वर आधारित OneUI 6 चालतो आणि त्यात Samsung च्या फ्लॅगशिप डिव्हाइससारखे Galaxy AI आहे, जे Google Gemini वर आधारित आहे.