Instagram वरील प्रायव्हसी संपली... अखेर कंपनीने हटवले 'ते' फीचर, यूजर्सवर कसा होणार परिणाम?
मार्च महिन्यात जारी करण्यात आलेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये कंपनीने या बदलाबाबत माहिती शेअर केली होती. यामध्ये कंपनीने म्हटलं होतं की, जर तुमच्या चॅट्सवर या बदलाचा परिणाम झाला तर तुम्हाला निर्देश दिले जातील की तुम्ही संबंधित मेसेज किंवा मीडिया डाऊनलोड करून कशा पद्धतीने सुरक्षित ठेऊ शकता. याचा अर्थ असा आहे की, बदल लागू झाल्यानंतर यूजर्स त्यांचे असे चॅट्स बॅकअप आणि डाऊनलोड करू शकतात, जे त्यांना खाजगी ठेवायचे आहेत.
इंस्टाग्रामवरील एंड-टू-एंड एन्क्रिप्शन हटविण्यात आले आहे. याचा अर्थ तंत्रज्ञानाची माहिती असलेली कोणतीही व्यक्ती तुमचे मेसेज पाहू शकणार आहे. आता तुमचे चॅट्स प्रायव्हेट राहणार नाहीत आणि याचा चुकीचा वापर देखील केला जाऊ शकतो. हा बदल सध्या केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामपुरता मर्यादित आहे. मेटाने अद्याप स्पष्ट केले नाही की, हा बदल फेसबूक मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपसाठी देखील लागू केला जाणार आहे की नाही.
कंपनीने घेतलेल्या या निर्णयामागील कारण लहान मुलांची सुरक्षा असल्याचे सांगितलं जात आहे. या वर्षी मार्चमध्ये, न्यू मेक्सिकोमधील एका ज्युरीने मेटा कंपनीवर 375 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला होता. यावेळी प्लॅटफॉर्मच्या सुरक्षेबद्दल ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आणि बाल लैंगिक शोषणासारख्या हानीकारक गोष्टींना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर आता कंंपनीने हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन हटवल्यानंतर कंपनी गरज असल्यास मेसेज स्कॅन करू शकणार आहे. ज्यामुळे बाल लैंगिक शोषणाशी संबंधित साहित्य (CSAM), ग्रूमिंग किंवा छळाच्या इतर प्रकारांशी संबंधित कंटेट शोधण्यासाठी मदत होऊ शकते.
5,300mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर… नव्या Honor स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, किंमत खिशाला परवडणारी
अमेरिका आणि युनायटेड किंगडमसह जगभरातील सरकारे, तसेच युरोपियन युनियनमधील धोरणकर्ते कंपन्यांवर दबाव आणत आहेत की, खाजगी मेसेजिंग ॲप्समधून अशी हानिकारक सामग्री ओळखावी आणि संबंधित सामग्री हटविण्यात यावी.






