काय सांगता! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार Samsung Galaxy स्मार्टफोन, Instamart ने सुरु केली सुपरफास्ट सर्विस
तुम्ही देखील सॅमसंग यूजर आहात का? किंवा सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लोकप्रिय टेक ब्रँड Samsung ने भारतात त्यांच्या गॅलेक्सी रेंज प्रोडक्ट्सची डोरस्टेप डिलीव्हरी देण्यासाठी क्लिव डिलीव्हरी पार्टनर इंस्टामार्टसोबत पार्टनरशिप केली आहे. त्यामुळे आता जर तुम्हाला नवीन सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला घराबाहेर जाण्याची गरज नाही. तुम्हाला घरबसल्या नवीन Samsung Galaxy स्मार्टफोनची डीलीव्हरी मिळणार आहे.
साउथ कोरियन ब्रँड Samsung ने इंस्टंट डिलीव्हरी प्लॅटफॉर्म इंस्टामार्टसह सहयोग करत नवीन सर्विसबाबत घोषणा केली आहे. कंपनीच्या या कोलेबोरेशनने मेट्रो शहरांतील कस्टमर इंस्टामार्टद्वारे Samsung Galaxy स्मार्टफोन, टॅबलेट, वियरेबल्स आणि एक्सेसरीज ऑर्डर करून या वस्तूंची डोरस्टेप डिलीव्हरी मिळवू शकतात. रोजच्या वापरातील महत्त्वाच्या वस्तूंसोबतच आता ग्राहक हे गॅझेट्स देखील ऑर्डर करू शकणार आहेत. इंस्टामार्ट आधीच काही ठिकाणी Apple, Samsung, OnePlus आणि Redmi स्मार्टफोनची क्विक डिलीव्हरी ऑफर करत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
इंस्टामार्टसह केलेल्या पार्टनरशिपचा एक भाग म्हणून सॅमसंग क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये गॅलेक्सी रेंजच्या प्रोडक्ट्सची इंस्टंट डिलीव्हरी देणार आहे. कंपन्यांनी केलेल्या या पार्टनरशिपनंतर आता ग्राहक इंस्टामार्टद्वारे काही निवडक गॅलेक्सी स्मार्टफोन, टॅबलेट, वियरेबल्स आणि एक्सेसरीज ऑर्डर करू शकणार आहेत आणि या सामानाची डिलीव्हरी अगदी काही मिनिटांतच केली जाणार आहे.
राष्ट्राध्यक्ष Putin स्मार्टफोनपासून दूर का? अखेर उघड झालं अनोखं कारण, वाचाल तर तुम्हीही थक्का व्हाल
Samsung आणि इंस्टामार्ट पार्टनरशिप उपलब्ध असलेल्या मेट्रो शहरांची लिस्ट अद्याप घोषित करण्यात आली नाही. मात्र सध्या इंस्टामार्ट बंगळुरु आणि दिल्ली सारख्या शहरामध्ये Galaxy M36, Galaxy M56, Galaxy F06 आणि Galaxy Buds Core सारखे काही सॅमसंग प्रोडक्ट्स आणि दूसऱ्या एक्सेसरीजची डोरस्टेप डिलीव्हरी ऑफर करत आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गॅलेक्सी प्रोडक्ट्स आता ऑर्डर दिल्यानंतर 10 मिनिटांच्या आधीच डिलीव्हरी होणार आहे. इंस्टामार्ट भारतातील काही शहरांमध्ये Apple, Motorola, OnePlus आणि Redmi सारख्या ब्रँड्सच्या स्मार्टफोनची क्विक डिलीवरी ऑफर करतो. हे प्लॅटफॉर्म Asus चे लॅपटॉप आणि एक्सेसरीज, जसे कीबोर्ड, चार्जर आणि माउस देखील डिलीवर करतो. इंस्टामार्टवर ऑर्डर देताना ग्राहक वेगवेगळ्या प्रोडकट्सवर वेगवेगळे डिस्काऊंट आणि नो-कॉस्ट EMI ऑप्शनचा लाभ घेऊ सकणार आहे. क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म काही निवडक बँक कार्डच्या खरेदीवर एक्स्ट्रा डिस्काऊंट देखील ऑफर करतात.
Ans: साधारणपणे 10–60 मिनिटांत (जागेवर अवलंबून) डिलिव्हरी मिळते. काही ठिकाणी Same-Day किंवा Express Delivery सुविधा आहे.
Ans: होय, ऑर्डर डिलिव्हरी होण्यापूर्वी App मध्ये “Cancel/Modify” पर्याय वापरून बदलू शकता.
Ans: साधारण ₹199–₹250, पण ठिकाणानुसार बदलू शकते.






