Sugar Free Biscuits : चहासोबत बिस्किटे असतील तर चहाची मजा आणखीनच वाढते. बाजारात मिळणारे मैद्याचे आणि साखरयुक्त बिस्किटे आपल्या आरोग्यासाठी चांगले ठरत नाही. अशात घरीच तुम्ही हेल्दी पद्धतीने विना साखरेचे खुशखुशीत
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
लहानापांसून मोठ्यांना बिस्किटे खायला फार आवडतात.
चहासोबत यांची चव आणखी छान लागते.
तुम्ही घरी देखील सोप्या पद्धतीने हेल्दी बिस्किटे तयार करु शकता.
सध्या अनेक जण आरोग्याची काळजी घेत असल्यामुळे साखरेचे सेवन कमी करण्यावर भर देतात. मधुमेह असलेले लोक, वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणारे किंवा हेल्दी स्नॅक्सचा पर्याय शोधणारे लोक शुगर फ्री पदार्थांना प्राधान्य देतात. अशा वेळी घरी तयार केलेली शुगर फ्री बिस्किटे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ही बिस्किटे बनवण्यासाठी परिष्कृत साखरेऐवजी खजूर, मनुका किंवा केळ्याचा नैसर्गिक गोडवा वापरला जातो. त्यामुळे चव आणि पौष्टिकता दोन्ही टिकून राहतात. चहासोबत, मुलांच्या डब्यात किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी ही बिस्किटे उत्तम लागतात. शिवाय घरच्या घरी बनवल्यामुळे त्यामध्ये कोणतेही कृत्रिम रंग किंवा प्रिझर्व्हेटिव्ह्ज नसतात. चला जाणून घेऊया रेसिपी.