(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
बिहारची राजधानी पटणा येथील दीघा परिसरात सदर घटना घडून आली. घटनेचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले असून यात तरुणींची फजिती स्पष्ट दिसून येते. व्हायरल व्हिडिओनुसार, दोन तरुणी दुकान लुटण्यासाठी मास्क घालून दागिन्यांच्या दुकानात एंट्री घेतात. त्या सुरुवातीला खरेदी करण्यासाठी आल्याचे भासवतात आणि जेव्हा दुकानदार त्यांना दागिने दाखवू लागतो तरुणी त्याच्यावर मिर्ची स्प्रेने हल्ला करतात. त्या दुकानात लूट करण्याचा प्रयत्न करतात खर पण दुकानदार वेळीच चेहऱ्यावरुन स्प्रे साफ करत त्यांना पकडायला धाव घेतो. तो वेगाने धावत तरुणी पळतील याआधीच दरवाजाजवळ जातो आणि त्यांना पळण्यापासून रोखतो.
व्हिडिओत दिसते की, दुकानदार फार शिताफीने तरुणींना त्यांच्याच जाळ्यात अडकवतो. तो दुकानाबाहेर पडून बाहेरुन लाॅक लावतो आणि तरुणींना दुकानाच्या आतमध्येच डांबून ठेवतो. आपली चोरी पकडली गेली आहे हे समजताच तरुणी घाबरतात आणि आपला चेहरा लपवू लागतात. दुकानदार राजेश कुमारचा आवाज ऐकताच आजूबाजूची लोक घटनास्थळी दाखल होतात ज्यानंतर तरुणींना जमावाकडून जोरदार मारहाण केली जाते. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून दोन्ही मुलींची चाैकशी केली जात आहे.
“बिहार की लड़की किसी से कम है क्या?”
पटना के दीघा में दो लड़कियाँ लूटने पहुँची ज्वैलरी शॉप, पेपर स्प्रे मारते ही हो गया कांड । pic.twitter.com/3GNEpNR9mz — Bhoopesh_Govt_aspirants (@Bhoopesh221) June 13, 2026
श्वानाला पाहून पळाला अन् अपघाताला बळी पडला, घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद; Video Viral
या घटनेचा व्हिडिओ @Bhoopesh221 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “काय चोर बनणार रे तू”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “इतक्या लहान वयात त्यांना अस करण्याची वेळ आलीच कशी?” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “दोघींना बुकलून हाणायला हवं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






