Smashed Aloo Tikki Taco Recipe : मागील काही काळापासून सोशल मिडियावर स्मॅश्ड आलू टिक्की टॅको ही रेसिपी फार ट्रेंड करत आहे. स्ट्रीट फूड लव्हर्स असाल तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. ही एक इंडियन फ्यूजन डिश आहे जी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टीफिनसाठी तयार केली जाऊ शकते.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
टॅको हा पाश्चात्य पदार्थ आहे तर आलू टिक्की हा देसी भारतीय पदार्थ आहे.
दोन्ही पदार्थांच्या मिश्रणाने आपण एक हटके पदार्थ आज तयार करणार आहोत.
याची चव तुम्हाला नक्कीच आवडेल, पार्टी स्नॅक्ससाठीही तुम्ही हा पदार्थ घरी बनवू शकता.
स्मॅश्ड आलू टिक्की टॅको हा पदार्थ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला एक फ्युजन स्ट्रीट फूड प्रकार आहे. भारतीय आलू टिक्कीची चव आणि मेक्सिकन टॅकोची स्टाइल यांचा अनोखा संगम या रेसिपीत पाहायला मिळतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेली आलू टिक्की, त्यावर ताज्या भाज्या, सॉस आणि चीजचा स्वाद यामुळे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. विशेष म्हणजे ही रेसिपी घरी सहज तयार करता येते आणि संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा पाहुण्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरते. जर तुम्हाला नेहमीच्या चाट किंवा टिक्कीपेक्षा काहीतरी वेगळे आणि ट्रेंडी बनवायचे असेल, तर स्मॅश्ड आलू टिक्की टॅकोची ही रेसिपीतुम्ही एकदा तरी नक्कीच घरी बनवायला हवी. चला नोट करुन घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.