Gmail मधील बगमुळे युजर्स हैराण! अनेकांना ईमेल उघडताच येईना, नेमकं काय घडलं?
जीमेल उघडल्यानंतर तुमच्या डिव्हाइसची स्क्रीन फ्लिकर होऊ लागल्यास किंवा ब्लँक झाल्यास, घाबरून जावू नका. कारण जीमेलमधील एका बगमुळे आजकाल ईमेल वाचणे कठीण झाले आहे. ही समस्या विशेषतः अँड्रॉइड डिव्हाइसेसवर जास्त प्रमाणात दिसून येत आहे. युजर्सच्या मते, या बगमुळे स्क्रीन फ्लिकर होणे, मजकूर दिसेनासा होणे किंवा संपूर्ण स्क्रीन ब्लँक होणे यांसारख्या समस्या येत आहेत. गेल्या ४-५ दिवसांपासून जीमेल वापरकर्त्यांना या बगमुळे समस्या येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या जीमेल बगवर कोणताही उपाय प्रभावी ठरत नाहीये. एका युजर्सने गूगल सपोर्ट फोरमवर लिहिले, “जेव्हा मी ईमेल उघडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा स्क्रीन फ्लिकर होऊ लागते आणि ईमेल वाचले जात नाहीत. मी फोर्स स्टॉप करणे, कॅशे क्लिअर करणे आणि माझा टॅबलेट रीस्टार्ट करणे असे प्रयत्न केले आहेत. अपडेट करूनही ही समस्या सुटत नाही.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, “जेव्हा मी माझ्या टॅबलेटवर ईमेल उघडतो, तेव्हा स्क्रीन ब्लँक होते. मला माझ्या फोनवर ही समस्या येत नाही.”
जीमेल बगमुळे सॅमसंग डिव्हाइसेसना सर्वाधिक फटका बसत आहे. अहवालानुसार, सॅमसंग टॅब्लेट आणि गॅलेक्सी झेड फोल्ड ३ सह काही फोल्डेबल फोनच्या वापरकर्त्यांना सर्वाधिक समस्या येत आहेत. तज्ञांच्या मते, ही समस्या अँड्रॉइड सिस्टम वेबव्ह्यूमुळे (Android System WebView) निर्माण होत आहे. गूगलला याची माहिती देण्यात आली आहे, परंतु कंपनीने अद्याप या समस्येवर कोणतेही निवेदन किंवा उपाय जाहीर केलेला नाही.
गूगलने अद्याप ही समस्या सोडवलेली नाही. मात्र जर तुम्हाला ईमेल वाचायचे असतील, तर काही उपाय आहेत जे मदत करू शकतात. पहिली पद्धत म्हणजे तुमचे डिव्हाइस पोर्ट्रेट मोडमधून लँडस्केप मोडमध्ये आणि नंतर पुन्हा पोर्ट्रेट मोडमध्ये बदलणे. हे ऑटो-रोटेट फीचर चालू करून देखील केले जाऊ शकते. हे फीचर चालू केल्यानंतर, तुमचे डिव्हाइस दोन्ही मोडमध्ये वापरून पहा. दुसरा पर्याय म्हणजे, अँड्रॉइड सिस्टम वेबव्ह्यूचा कॅशे साफ करा आणि ते अपडेट करा. असे सांगितले जात आहे की याच कारणामुळे हा बग समस्या निर्माण करत आहे.
Google I/O 2026: AI दुनियेत Google ची मोठी झेप! Gemini Flash आणि Omni मॉडेल्स ठरणार गेमचेंजर






