Free Fire MAX: प्लेअर्सचं अकाऊंट का बॅन होतं? या चुका टाळा, नाहीतर गेम होईल लॉक
काही प्लेअर्स गेममध्ये जिंकण्यासाठी ऑटो एम, वॉल हॅक किंवा अनलिमिटेड डायमंड्स सारख्या चुकीच्या टूल्सचा वापर करतात. असे खेळणं गेमच्या नियमांच्या विरोधात असतं. फ्री फायर मॅक्स सिस्टिम अशा प्लेअर्सना लगेच ओळखते आणि त्यांचे अकाऊंट डिलीट किंवा कायमचे बॅन करते. यामुळे प्लेअर्स गेममध्ये लॉगिन करू शकत नाहीत. तसेच त्यांची गेममधील प्रगती देखील थांबते. (फोटो सौजन्य – Pinterest)
इंटरनेटवर अनेक मोडियाफाईड वर्जनवर उपलब्ध आहेत, जे गेममध्ये जास्त फीचर्स देण्याचा दावा करतात. मात्र हे थर्ड पार्टी अॅप्स असुरक्षित असतात आणि गेमच्या निमयांच्या विरोधात असतात. जर तुम्ही अशा थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करत असाल तर तुमचे अकाऊंट बॅन होऊ शकतं.
तिसरं कारणं म्हणजे टिम बनवणं किंवा चुकीचं खेळणं. बॅटल रॉयल गेममध्ये काही प्लेअर्स एकत्र येऊन चुकीच्या पद्धतीने गेम खेळतात, याला चिटींग मानली जाते. यामुळे तुमचे अकाऊंट बॅन होऊ शकतं.
जर तुम्ही चॅट्समध्ये शिवीगाळ केली, चुकीच्या भाषेचा वापर केला किंवा एखाद्या प्लेअरला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर दुसरे प्लेअर्स तुमचं अकाऊंट रिपोर्ट करू शकतात. ज्यामुळे कंपनी कारवाई करत तुमचं अकाऊंट बॅन करू शकते.
काही प्लेअर्स चुकीच्या पद्धतीने डायमंड्स क्लेम करतात किंवा अनाधिकृत वेबसाईट्सची मदत घेतात, जे नियमांच्या विरोधात असते. सिस्टमला ही कृती संशयास्पद वाटल्यास, तुमचे खाते बंद केले जाऊ शकते.
सहावे कारण म्हणजे अकाऊंट शेअर करणं किंवा विकणं. फ्री फायर मॅक्समध्ये तुमचे अकाऊंट कोणत्या दुसऱ्या प्लेअर्सना विकणं नियमांच्या विरोधात असतं. यामुळे सुरक्षा कमी होते आणि अकाऊंट बॅन होऊ शकतं.






