Oneplus 15 यूजर्सची चिंता संपली! आता iPhone वर फाईल्स शेअर करणं झालं आणखी सोपं... असं काम करणार नवं फीचर
गुगलने यापूर्वी हे फिचर निवडक पिक्सेल डिव्हाईसवर सादर केले होते. त्यानंतर काही अँड्रॉइड ब्रँड्ससाठी देखील फिचर रोल आउट करण्याचा निर्णय घेण्यात आला. अलीकडेच शाओमीने देखील त्यांच्या HyperOS 3 द्वारे एअर ड्रॉप सुसंगतीची घोषणा केली होती. यामुळे अँड्रॉइड इकॉसिस्टीममधील क्रॉस प्लॅटफॉर्म फाईल शेअरिंगचा वाढता ट्रेंड पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अँड्रॉइड ऑथोरिटीने शेअर केलेल्या एका रिपोर्टनुसार, क्विक शेअरद्वारे वनप्लस 15 वर एअरड्रॉप सुसंगता दिसण्यास सुरुवात झाली आहे. पब्लिकेशनने असा दावा केला आहे की, त्यांनी स्वतः एका वनप्लस 15 युनिटवर या नवीन सुविधेची चाचणी केली आहे. वनप्लस कम्युनिटी फोरमवरील एका वेगळ्या पोस्टने असे संकेत मिळत आहेत की, अनेक युजर्सना त्यांच्या वनप्लस 15 डिव्हाईसवर हे फीचर मिळाले आहे. या इंटीग्रेशनच्या मदतीने वनप्लस 15 यूजर्स कोणत्याही थर्ड-पार्टी अॅप्लिकेशन किंवा क्लाउड-बेस्ड ट्रांसफर सर्विसवर अवलंबून न राहता, थेट सपोर्टेड अॅपल डिव्हाईसवर फाईल्स पाठवू शकतात. गुगलने अॅपल एअरड्रॉपसह फाईल एक्सचेंजसाठी क्विक शेअर सपोर्ट सादर करण्याच्या काही महिन्यांनंतर वनप्लस 15 यूजर्ससाठी इंटीग्रेशन रोलआऊट केलं जात आहे.
रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, सध्या वनप्लस 15 एकमेव असा वनप्लस स्मार्टफोन आहे, ज्याच्यासाठी हे नवं फीचर रोलआऊट केलं जात आहे. वनप्लस 13 सह जुने प्लॅगशिप मॉडेल्स सध्या सपोर्टेड डिव्हाईसच्या यादीमध्ये समाविष्ट नाही. हीच गोष्ट सध्या कंपनीच्या प्रिमियम टॅब्लेट्सवर देखील लागू होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, वनप्लसची सिस्टर ब्रँड असलेल्या ओप्पोचे फाईंड एक्स 8 स्मार्टफोन्स आधीपासूनच या फंक्शनलिटीला सपोर्ट करणाऱ्या संभाव्य डिव्हाईसच्या यादीत समाविष्ट आहेत. गुगल, विवो आणि ओप्पोच्या काही दुसऱ्या डिव्हाईसबाबत असं सांगितलं जात आहे की, हे क्रॉस-प्लॅटफॉर्म फाइल-शेयरिंग सिस्टिमला सपोर्ट करतात. ज्यामध्ये पिक्सेल 9 सिरीज, पिक्सेल 8a, विवो X300 अल्ट्रा आणि ओप्पो फाइंड X9 फॅमिली समाविष्ट आहे.
रिपोर्टनुसार, जेव्हा गुगल प्ले स्टोअरद्वारे क्विक शेअर डिव्हाईसच्या लेटेस्ट वर्जनवर अपडेट केले जाईल, तेव्हा हे फीचर उपलब्ध होणार आहे. यासाठी वनप्लस 15 यूजर्सना कोणतेही सॉफ्टवेअर अपडेट किंवा कॉन्फिगरेशनमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. अॅपल डिव्हाईसवर फाईल रिसीव्ह करण्यासाठी यूजर्सना ‘एव्हरीवन’वर एअरड्रॉप रिसेप्शन तात्पुरते सक्षम करावे लागेल.
Ans: OnePlus ही चीनची स्मार्टफोन आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे.
Ans: वनप्लसची स्थापना 2013 मध्ये झाली होती.
Ans: होय, वनप्लस स्मार्टफोन दमदार परफॉर्मन्स, प्रीमियम डिझाइन आणि फास्ट चार्जिंगसाठी ओळखले जातात.






