फीचर्स फोन्ससाठी लवकरच लाँच होणार UPI पेमेंट अॅप, PhonePe ने दिली माहिती! आता इंटरनेटशिवाय होणार पेमेंट
यूपीआय अॅपवरून पेमेंट करायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टींची गरज असते, एक आहे स्मार्टफोन आणि दुसरं म्हणजे इंटरनेट. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, यूपीआय अॅपचा वापर करण्यासाठी तुम्हाला या दोन्ही गोष्टींची गरज नाही तर? होय, तुम्ही बरोबर वाचलं आहे, आता यूपीआय अॅपवरून पेमेंट करण्यासाठी ना स्मार्टफोनची गरज आहे आणि ना इंटरनेटची. आता टेक कंपनी PhonePe फीचर्स फोनसाठी लवकरच नवीन अॅप लाँच करणार आहे.
PhonePe ने घोषणा केली आहे की, भारतात नवीन फीचर्स फोन युजर्ससाठी यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सॉल्यूशन लाँच केलं जाणार आहे. याची कंपनी तयारी करत आहे. डिजिटल पेमेंट्स आणि फाइनेंशियल सर्विसेज कंपनीने सांगितलं आहे की, त्यांचं अपकमिंग पेमेंट सॉल्यूशन NPCI च्या UPI 123Pay तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. हे सर्विस कन्वर्सेशनल एंगेजमेंट प्लॅटफॉर्म Gupshup च्या GSPay टेक स्टॅकवर आधारित असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
कंपनी फीचर फोन्सवर बेसिक UPI फीचर्स सपोर्ट ऑफर करणार आहे आणि यासाठी कंपनीची तयारी देखील सुरु झाली आहे. ही सर्विस भारतात सुरु होण्यासाठी काही वेळ लागणार आहे. सर्विस नक्की कधी सुरु होणार याची लाँच डेट अद्याप जाहीर करण्यात आली नाही. मात्र या नव्या सर्विसमुळे युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे, यात काही शंकाच नाही.
प्रेस रिलीजमध्ये कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांनी Gupshup च्या प्रोप्राइटरी GSPay टेक्नोलॉजी स्टॅकची इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (IP) खरेदी केली आहे. आता फोनपे हे प्लॅटफॉर्म कस्टमाइज करणार आहे आणि त्यावर त्यांचे यूपीआय सोल्यूशन तयार करेल. Gupshup ने 2023 मध्ये फीचर फोन्स युजर्सना SMS-बेस्ड पेमेंट एक्सपीरियंस मिळावा, यासाठी GSPay लाँच केले होते.
PhonePe ने सांगितलं आहे की, GSPay ला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या UPI 123Pay सर्विसनुसार तयार केलं जाणार आहे. ज्याला 2022 मध्ये तत्कालीन आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी लाँच केलं होतं. आता कंपनी स्वतःचे यूपीआय सोल्यूशन तयार करण्यासाठी जीएसपेच्या तंत्रज्ञानाचा विस्तार करणार आहे.
@PhonePe to Launch UPI Payments for New Feature Phone Users!
We’re excited to announce that PhonePe has acquired the GSPay technology stack from conversational engagement platform @Gupshup. This move will help us enable UPI payments on new feature phones, furthering our… pic.twitter.com/Ra0jF5lH7j
— PhonePe (@PhonePe) June 6, 2025
UPI 123Pay एक रियल-टाइम UPI सॉल्यूशन आहे, ज्याचा वापर करण्यासाठी इंटरनेट सर्विसची गरज नसते आणि याला फीचर फोन्स आणि लिमिटेड कनेक्टिविटीवाल्या यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आलं आहे. यामध्ये चार ट्रांजेक्शन मेथड्स ऑफर केले जातात, ज्यामध्ये इंटरॅक्टिव वॉयस रिस्पॉन्स (IVR) नंबरवर कॉल करणं, अॅप-बेस्ड सर्विस, मिस्ड कॉल-बेस्ड अप्रोच आणि साउंड-बेस्ड प्रॉक्सिमिटी पेमेंट सिस्टम यांचा समावेश आहे.
कंपनीचे UPI सॉल्यूशन देखील विविध फीचर्स ऑफर करणार आहे. हे पर्सन-टू-पर्सन (P2P) ट्रांसफर, ऑफलाइन QR कोड-बेस्ड पेमेंट्सना सपोर्ट करणार आहे आणि यूजर्सना दूसऱ्या UPI यूजर्सकडून त्यांच्या मोबाईल नंबर किंवा सेल्फ-QR कोड्सवर पैसे रिसीव करण्याची सुविधा दिली जाणार आहे. PhonePe ने सांगितलं आहे की, हे सॉल्यूशन भारतात फीचर फोन्स आणि स्मार्टफोन यूजर्समध्ये “फुल पेमेंट इंटरऑपरेबिलिटी’ तयार करणार आहे.