Samsung R20 Ultrasound System
सॅमसंगचे अत्याधुनिक किस्टल आर्किटेक्चरवर आधारित आर२० विविध जनरल इमेजिंग उपयोजनांमध्ये अपवादात्मक इमेज समानता, रिझॉल्यूशन आणि प्रवेश दर्शवते. यामधील नेक्स्ट-जनरेशन इमेजिंग इंजिन, शक्तिशाली जीपीयू आणि अल्ट्रा-हाय-डेफिनिशन ओएलईडी मॉनिटर क्लिनिशियन्सना प्रत्येक स्कॅनमध्ये उल्लेखनीय सुस्पष्टता देते, ज्यासह त्यांना आत्मविश्वासाने निदान करता येते. आर२० मध्ये एआय-समर्थित क्लिनिकल आणि कार्यप्रवाह वाढवणाऱ्या टूल्सची सर्वसमावेशक श्रेणी आहे, जे गुंतागूंतीच्या प्रक्रिया सुव्यवस्थित करतात आणि वारंवार केल्या जाणाऱ्या टास्क्सना स्वयंचलित करतात.
प्रमुख तंत्रज्ञान पुढीलप्रमाणे:
इमेजिंग क्षमतांव्यतिरिक्त आर२० वापरकर्त्यांना आरामदायीपणा व ऑपरेशल उत्कृष्टता देते. एर्गोनॉमिक्स लक्षात घेत डिझाइन करण्यात आलेल्या या सिस्टममध्ये वजनाने हलके ट्रान्सड्यूसर केबल्स, सर्वोत्तम टच इंटरफेस आणि सानुकूल सिस्टम कन्फिग्युरेशन्स आहेत, जे विविध क्लिनिकल गरजांची पूर्तता करतात. सिस्टमची सुधारित डिझाइन तणाव आणि थकवा कमी करते, ज्यामुळे क्लिनिशियन्स सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या रूग्णांवर लक्ष केंद्रित करू शकतात.
आर२० च्या लाँचसह सॅमसंग आरोग्यसेवा तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देण्याप्रती आपली कटिबद्धता दृढ करत आहे. एआय-संचालित उत्कृष्टता आणि उच्च दर्जाच्या इमेजिंग कार्यक्षमतेला एकत्र करत आर२० जनरल इमेजिंग क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यास सज्ज आहे. या सिस्टमची डिझाइन क्लिनिशियन्स आणि रूग्णांना अधिक केअर देते.






