MWC 2025: अद्भुत! लॅपटॉप की ब्रीफकेस? Samsung ची कमाल, सादर केलं अनोख गॅझेट; फोल्ड होताच दिसेल मॅजिक
बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 या ईव्हेंटमध्ये जगभरातील टेक कंपन्यांनी त्यांचे अनोखे आणि लेटेस्ट गॅझेट्स लाँच केले आहेत. याशिवाय अनेक कंपन्यांनी त्यांच्या संकल्पना या ईव्हेंटमध्ये सादर केल्या आहेत. MWC 2025 मध्ये आपल्याला भविष्यात कशा प्रकारचं तंत्रज्ञान अनुभवण्याची संधी मिळणार आहे आणि कोणते गॅझेट्स पाहता येणार आहे, या सर्वांची एक छोटीशी झलक पाहायला मिळते. आतापर्यंत या ईव्हेंटमध्ये अनेक नवीन गॅझेट्स लाँच करण्यात आले आहेत. आता या शर्यतीत Samsung देखील सहभागी झाला आहे.
Samsung ने MWC 2025 ईव्हेंटमध्ये एक अनोखा लॅपटॉप सादर केला आहे. खरं तर हा लॅपटॉप एका ब्रिफकेसच्या डिझाईनमध्ये लाँच करण्यात आला आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही हा लॅपटॉप फोल्ड करता तेव्हा तो ब्रिफकेसचा आकार घेतो. त्यामुळे तुम्ही हा लॅपटॉप अगदी सहज कुठेही घेऊन जाऊ शकता. हा लॅपटॉप म्हणजे Samsung Flexible Briefcase. Samsung Flexible Briefcase एका अनोख्या डिझाईनसह लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
MWC 2025 या ईव्हेंटमध्ये लोकप्रिय टेक कंपनी Samsung ने लेटेस्ट इनोवेशन “Flexible Briefcase” सादर केला आहे. ही एक फोल्डेबल लॅपटॉप कॉन्सेप्ट आहे. या अद्भुत डिव्हाईसमध्ये 18.1 -इंचाचा QD-OLED डिस्प्ले आहे, जो 2,000 x 2,664 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 184 PPI पिक्सेल डेन्सिटीला सपोर्ट करतो. त्याच्या अद्भुत डिझाइनमुळे Samsung Flexible Briefcase लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यात दोन हँडल जोडलेले आहेत, जे दुमडल्यावर ब्रीफकेस हँडलसारखे काम करतात. ब्रीफकेसमध्ये पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे देखील जोडण्यात आली आहेत, जी स्टाइल तसेच कार्यक्षमतेला समर्थन देतात.
मोठी स्क्रीन आणि फोल्डेबल मेकॅनिझम या लॅपटॉपला इतरांपेक्षा वेगळे बनवते. जर कंपनीने हा लॅपटॉप व्यावसायिकरित्या लाँच केला तर तो क्रिएटर्सची पसंती बनू शकते. ही सध्या फक्त एक संकल्पना आहे. ते विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हा लॅपटॉप बाजारात येण्यासाठी बराच काळ लागू शकतो.
Samsung व्यतिरिक्त Lenovo ने देखील MWC 2025 मध्ये, सौरऊर्जेवर चालणाऱ्या लॅपटॉपची संकल्पना सादर केली आहे. त्यात सौर पॅनेल बसवले आहेत, जे विजेशिवाय थेट सूर्यप्रकाशापासून लॅपटॉर चार्ज करू शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की लॅपटॉप 20 मिनिटे उन्हात ठेवल्याने एक तासाचा व्हिडिओ प्लेबॅक मिळू शकतो. लॅपटॉपमध्ये 84 सोलर सेल असलेले पॅनेल आहे, जे 24 टक्के कार्यक्षमतेने सूर्यप्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर करू शकते. Lenovo च्या या नवीन लॅपटॉपमध्ये इंटेलचा लूनर लेक प्रोसेसर, 32 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेज आहे. 15 मिमी जाडी आणि 2.29 पौंड वजनाच्या या डिव्हाईसमध्ये 14-इंचाचा OLED डिस्प्ले आहे.