संचार साथी अॅपवर गंभीर आरोप, हेरगिरी करणारा अॅप म्हणतं विरोधकांनी केली टीका! काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर
संचार साथी अॅप फोनमध्ये प्री-इंस्टॉल करायला सांगितल्यापासून वाद वाढला आहे. विरोधकांनी सांगितलं आहे की, सरकार या अॅपद्वारे यूजर्सची हेरगिरी करणार आहे. मात्र सरकारचं असं म्हणणं आहे की, हे कोणतेही हेरगिरी करणारा अॅप नाही, तर हे एक सायबर सिक्योरिटी टूल आहे. या अॅपबाबत केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं आहे की, हे अॅप फोन्ससाठी अनिवार्य नाही. यूजर्स देखील हे अॅप डिलीट करू शकतात. हे अॅप यूजर्सची सायबर सुरक्षा वाढावी, यासाठी प्री – इंस्टॉल करण्याचे आदेश दिले होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, संचार साथी अॅप एक सायबर सिक्योरिटी टूल आहे. हे अॅप जानेवारी महिन्यात लाँच करण्यात आले होते. अॅपल अॅप स्टोअर आणि प्ले स्टोअरवरून यूजर्स हे अॅप डाऊनलोड करू शकतात. या अॅपच्या मदतीने यूजर्स सायबर फ्रॉड, फोन चोरी आणि कॉल मेसेज किंवा व्हॉट्सअॅपवर होणाऱ्या फ्रॉडला रिपोर्ट करू शकतात. या सर्वांसाठी संचार साथी अॅप इंस्टॉल केल्यानंतर त्याला काही परवानगी द्यावा लागणार आहेत. याच परवानग्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून विरोधकांनी संचार साथी अॅपला हेरगिरी करणारा अॅप म्हटलं आहे. हे अॅप यूजर्सकडून कोणत्या परवानग्या मागते, याबाबत जाणून घेऊया.
फोन कॉल करणं आणि त्यांना मॅनेज करणं: फोनमध्ये मोबाईल नंबरची ओळख पटवण्यासाठी ही परवागनी गरजेची आहे.
एसएमएस पाठवणं: अॅपमध्ये रजिस्ट्रेशनसाठी DoT ला एसएमएस पाठवणं.
कॉल/ एसएमएस पाठवणं: कॉल किंवा एसएमएसला संचार साथी अॅपमध्ये रिपोर्ट करण्यासाठी ही परवागनी गरजेची आहे.
फोटो आणि फाईल्स: कॉल किंवा एसएमएसची ईमेज अपडेट करण्यासाठी, चोरी झालेला मोबाईल आणि दुसऱ्या डॉक्यूमेंटसाठी ही परवागनी गरजेची आहे.
कॅमेरा: फोनमध्ये IMEI नंबर स्कॅन करण्यासाठी कॅमेरा एक्सेस देणं गरजेचं आहे.
फोटो आणि फाईल्स: कोणत्याही फ्रॉडला रिपोर्ट करण्यासाठी कॉल किंवा एसएमएसच्या ईमेज एक्सेस गरेजचा आहे. तसेच चोरी झालेला आणि हरवलेला मोबाईलचा रिपोर्ट करण्यासाठी फोटो आणि फाईल्स एक्सेस गरजेचा आहे.
कॅमेरा: फोनमध्ये असलेला IMEI नंबर स्कॅन करण्यासाठी कॅमेरा एक्सेस गरजेचा आहे.
संचार साथी अॅपबाबत सरकारने सांगितलं आहे की, हे अॅप यूजर्सची वैयक्तिक माहिती ऑटोमॅटिक कॅप्चर करत नाही. यासोबतच सरकारने असं देखील सांगितलं आहे की, जर यूजरकडे कोणत्याही वैयक्तिक माहितीची मागणी केली जात असेल तर यूजरला सांगितलं जात की, ही माहिती का मागितली जात आहे. यासोबतच यूजर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व महत्त्वाच्या उपाययोजनांची काळजी घेतली जाते.
संचार साथी अॅपच्या वेबसाईटमध्ये सांगितलं आहे की, यूजर्सची माहिती कोणत्याही थर्ड पार्टी अॅपसोबत शेअर केली जात नाही. याशिवाय, गरज असेल तेव्हा हा डेटा इन्फॉर्मेसमेंट एजंसीसोबत शेअर केला जाऊ शकतो. अॅपल अॅप स्टोअरमध्ये संचार साथी अॅपबाबत असा दावा केला जात आहे की, या अॅपचे डेव्हलपर यूजर्सचा कोणताही डेटा कलेक्ट करत नाहीत. अँड्रॉईड प्ले स्टोअरमध्ये असा दावा केला जात आहे की, हा अॅप डेटा कलेक्ट करत नाही. तसेच डेटा कोणत्याही थर्ट पार्टीसोबत शेअर देखील करत नाही.
फोनमध्ये इंस्टॉल केल्यानंतर संचार साथी अॅप ज्या परवानग्या मागत आहे, त्या अतिशय सामान्य आहेत. यूपीआय किंवा दुसऱ्या बँकिंग अॅप काम करण्यासाठी अशाच प्रकारच्या परवानग्या मागतात. सोशल मीडिया अॅप्सचा विचार केला तर अशा अॅप्सना आपण अनेक परवानग्या देतो. पण संचार साथी अॅप माईक, लोकेशन किंवा सेंसर सारख्या कोणत्याही परवानग्या मागत नाही. अशा परिस्थिती या अॅपवर जासूसी करण्याचा आरोप लावणं अत्यंत चुकीचं आहे. हा अॅप यूजर्सकडू केवळ फोन आणि एसएमएस, कॅमेरा आणि दुसऱ्या परवानगीचा एक्सेस मागतो, ज्या गरजेच्या आहेत.
Ans: Sanchar Saathi हा DoT (Department of Telecommunications) चा अधिकृत अॅप आहे, जो मोबाइल फोन चोरी, फसवणूक, सिम गैरवापर आणि KYC फ्रॉड रोखण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
Ans: होय! संचार साथी पूर्णपणे मोफत वापरता येतो.
Ans: TAFCOP (Telecom Analytics for Fraud Management) द्वारे तुमच्या आधार/ID वर किती सिम कार्ड्स जारी आहेत ते पाहता येते. अनोळखी SIM असल्यास रिपोर्ट करू शकता.






