Starlink down in US: अरे देवा! अमेरिकेत SpaceX Starlink ची इंटरनेट सर्विस ठप, 1000 हून अधिक यूजर्स हैराण
एलन मस्कची इंटरनेट सर्विस Starlink ची सेवा अमेरिकेत ठप्प झाली आहे. त्यामुळे युजर्स हैराण झाले असून एक्सवर अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. स्टारलिंक सर्विस आउटेजबाबत डाउनडिटेक्टरमध्ये अनेक युजर्सनी तक्रार केली आहे. आतापर्यंत अमेरिकेतील 1000 हून अधिक युजर्सनी स्टारलिंक डाऊनची तक्रार केली आहे. यामध्ये 86 टक्के युजर्सना नेटवर्कशी संबंधित अडचणींचा सामान करावा लागला आहे. तर 14 टक्के युजर्सना टोटल ब्लॅकआउटचा सामना करावा लागला आहे.
स्टारलिंक आउटेजमुळे युजर्सनी त्यांचा राग आणि प्रतिक्रिया एक्सवर शेअर केल्या आहेत. डाउनडिटेक्टरच्या कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने लिहीले आहे की, एलन मस्क आणि त्यांची कंपनी दाव्यांच्या उलट काम करते. स्टारलिंकचे नेटवर्क खूप खराब आहे. यासोबतच, एका यूजरचे म्हणणे आहे की तो काल इंटरनेट वापरू शकत होता पण आज परिस्थिती खूप वाईट आहे. तो त्याचा मोबाईल गेम वाय-फायशी कनेक्ट करू शकत नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
Why is Starlink Intenet Down?
— PhoonMan (@deanh0691) July 11, 2025
My phone loses signal going down the road and you’ve got planes with 4K video streaming.
— Keith Barbee (@Decayistruth) July 11, 2025
स्टारलिंकच्या कस्टमर सपोर्ट सर्विसला खराब म्हणत एका यूजरने लिहिले आहे की स्टारलिंक फक्त तेव्हाच चांगली असते जेव्हा ती काम करते. मग अचानक कनेक्शन बंद होते. यानंतर कोणताही ईमेल येत नाही, कॉल येत नाही. यामुळे युजर्स हैराण होतात. इंटरनेट बंद झाल्याने युजर्सना अनेक कामांमध्ये अडचणी येत आहेत. खरं तर ज्या ठिकाणी नेटवर्क पोहोचत नाही, अशा ठिकाणांसाठी स्टारलिंकची सेवा सुरु करण्यात आली आहे. अनेक देशांमध्ये ही सेवा लवकरच सुरु केली जाणार आहे. मात्र सध्या ज्या ठिकाणी ही सेवा सुरु करण्यात आलेल्या त्या ठिकाणी देखील ती योग्य प्रकारे काम करत नाही.
स्टारलिंक एलन मस्कची रॉकेट कंपनी स्पेसएक्सची सब्सिडरी कंपनी आहे. ही सॅटेलाईटद्वारे ब्रॉडबँड इंटरनेट सर्विस ऑफर करते. एलन मस्कची कंपनी हाय-स्पीड इंटरनेट आणि लो-लेटेंसी ब्रॉडबेंड इंटरनेट ऑफर करते. मस्कने त्यांच्या इंटरनेट सर्विससाठी पृथ्वीच्या लो-ऑर्बिटमध्ये 7 हजारहून अधिक सॅटलाईटची स्थापना केली आहे. हे सॅटलाईट पृथ्वीपासून 550 किलोमीटर अंतरावर आहेत. एलोन मस्कची इंटरनेट सेवा दुर्गम भागात इंटरनेट सेवा देण्यासाठी लोकप्रिय आहे. स्टारलिंक डेटा शेअरिंगसाठी उपग्रह-आधारित नेटवर्क वापरते. तर इतर कंपन्या केबल किंवा फायबर नेटवर्क वापरतात.
स्टारलिंकची भारतात लवकरच एंट्री होणार आहे. एलोन मस्कची कंपनी स्टारलिंकला भारत सरकारकडून सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. ही सेवा जगातील 100 हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे. देशातील सर्वात दुर्गम भागातील लोकांना इंटरनेट सेवा वापरता यावी, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) ने पुढील पाच वर्षांसाठी भारतात व्यावसायिक ऑपरेशन्ससाठी स्टारलिंकला मान्यता दिली आहे.