तुम्हालाही सतत Fake Call येतात? सुरक्षेसाठी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गाइडलाइन्स
सध्या फेक कॉल्स आणि स्कॅम कॉल्सच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. स्कॅमर्स आणि फ्रॉडर्स सामान्य लोकांना फसवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतात. ज्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. फसवणूक करणारे स्कॅमर्स आणि फ्रॉडर्स लोकांना वेगवेगळ्या मार्गांनी अडकवण्याचा आणि त्यांचा वैयक्तिक डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात. या कॉल्समध्ये स्कॅमर्स आणि फ्रॉडर्स सामान्य लोकांची बँकिंग, खोटे बक्षीस, लॉटरी जिंकणे अशा मार्गांनी फसवणूक करतात.
Vivo चा नवीन 5G फोन लाँच, मोठी बॅटरी आणि स्लिम डिझाईनने सुसज्ज! किंमत केवळ इतकी
काही लोक स्कॅमर्स आणि फ्रॉडर्सच्या बोलण्याला बळी पडतात, ज्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अशा परिस्थितीत या स्कॅमर्स आणि फ्रॉडर्सपासून सावध राहण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्यामुळे आपलं नुकसान होणार नाही. सरकार देखील सामान्य लोकांना स्कॅमर्स आणि फ्रॉडर्सपासून सावध करण्यासाठी नवनवीन उपाय वापरत आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलवर नेहमी सतर्क रहा. कॉलरने बँक, सरकारी अधिकारी किंवा मोठ्या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचा दावा केल्यास, त्यांच्या माहितीची पडताळणी करा. अनेक घटनांमध्ये असं घडलं आहे की, स्कॅमर्स आणि फ्रॉडर्स लोकांना फोन करून आपण बँक, सरकारी अधिकारी किंवा मोठ्या कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याचा दावा करतात. ज्यामुळे सामान्य लोकं घाबरतात आणि स्कॅमर्स आणि फ्रॉडर्सच्या फसवणूकीला बळी पडतात.
कोणत्याही कॉलवर तुमचा बँक खाते क्रमांक, OTP, डेबिट/क्रेडिट कार्ड तपशील किंवा आधार क्रमांक यासारखी माहिती कधीही देऊ नका. कोणतीही विश्वासार्ह संस्था फोनवरून अशी माहिती विचारत नाही. स्कॅमर्स आणि फ्रॉडर्स तुमच्याकडून तुमची वैयक्तिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला सतत फोन करत असतात. मात्र अशा कॉल्सला भूलू नये.
बनावट कॉल सामान्य लोकांना लॉटरी किंवा बक्षीस जिंकण्याचा दावा करतात. लॉटरी किंवा बक्षीस जिंकण्याच्या आनंदात आपण अनेकदा आपली वैयक्तिक माहिती अशा लोकांसोबत शेअर करतो, ज्यामुळे आपली फसवणूक होते. व्हेरिफिकेशनशिवाय कोणत्याही अज्ञात ऑफरवर विश्वास ठेवू नका.
Apple AirPods: गाणी ऐकण्यासोबतच आता हेल्थ अपडेटही मिळणार, Apple चं नवीन गॅझेट बरंच फायद्याचं ठरणार
तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध कॉल ब्लॉकिंग फीचर वापरा. Truecaller सारख्या ॲप्सच्या मदतीने संशयास्पद नंबर ओळखा आणि ब्लॉक करा. ज्यामुळे स्कॅमर्स आणि फ्रॉडर्सपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला मदत होईल.
तुम्हाला बनावट कॉलचा संशय असल्यास, तो रेकॉर्ड करा. या कॉलची तक्रार 1909 (DND हेल्पलाइन) किंवा सायबर क्राईम पोर्टल ( https://cybercrime.gov.in ) वर करा. असे नंबर लगेच रिपोर्ट करा.
स्कॅमर्स आणि फ्रॉडर्सला जर तुम्ही चुकून कोणतीही माहिती शेअर केली असेल तर ताबडतोब तुमच्या बँक आणि मोबाईल सेवा ऑपरेर्सना याबाबत माहिती द्या. तुमचे बँक खाते लॉक करा आणि नवीन पासवर्ड सेट करा. तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना बनावट कॉलच्या धोक्यांबद्दल सांगा. सायबर सुरक्षेशी संबंधित अपडेट्सकडे लक्ष द्या.






