Motorola च्या या स्मार्टफोन्सना नाही मिळणार Android 16 अपडेट, यादीत तुमचा फोन तर नाही ना?
गूगलनंतर आता स्मार्टफोन कंपनी Motorola देखील लवकरच लेटेस्ट अँड्रॉईड अपडेट रिलीज करणार आहे. आगामी Android 16 अपडेट रिलीज करण्याची तयारी सुरु झाली आहे. मात्र हे अपडेट रिलीज करण्यापूर्वीच कंपनीने एक यादी जारी केली आहे. कंपनीने या यादीमध्ये अशा स्मार्टफोन्सची नाव दिली आहेत, ज्यांना Android 16 अपडेट मिळणार नाही.
Android 16 ची रिलीज डेट समोर येण्यापूर्वीच Motorola ने अशा डिव्हाईसची माहिती दिली आहे, ज्यांच्यासाठी लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट जारी केलं जाणार नाही. या स्मार्टफोनची यादी आता आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. जर या यादीमध्ये तुमचा स्मार्टफोन देखील असेल तर त्याला देखील Android 16 अपडेट मिळणार नाही. मोटोरोलाने अद्याप कोणत्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 16 अपडेट मिळेल आणि कोणत्या स्मार्टफोनमध्ये मिळणार नाही याची पुष्टी केलेली नाही. कंपनीच्या नवीनतम अपडेट धोरणानुसार, ज्या स्मार्टफोनना अपडेट मिळणार नाही त्यांची माहिती समोर आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
यादीमध्ये देण्यात आलेल्या Motorola स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्सना Android 16 आणि भविष्यात कोणतंही ओएस अपडेट मिळणार नाही. जर तुमचा स्मार्टफोन देखील या यादीमध्ये असेल तर तुमच्या स्मार्टफोनसाठी देखील अपडेट जारी केलं जाणार नाही. जर तुम्हाला अँड्रॉईड 16 अपडेटची गरज असेल तर तुम्हाला तुमचा फोन नवनी मॉडेलर स्विच करावा लागणार आहे.
Motorola ची सॉफ्टवेयर अपडेट पॉलिसी सर्व डिव्हाईससाठी वेगवेगळी आहे. कंपनी Edge 50 Pro आणि Edge 50 Neo स्मार्टफोनला 5 अपडेट ऑफर करते. तर Edge 60 मॉडेलला कंपनी तीन अपडेट ऑफर करते. कंपनी नवीन स्मार्टफोन्ससाठी जुन्या फोनच्या तुलनेत अधिक अपडेट ऑफर करत आहे. या वर्षी लाँच झालेल्या Razr 2025 मॉडेल्सनाही 3 अपडेट्स मिळण्याची शक्यता आहे. मोटोरोलाच्या मिड-रेंज आणि बजेट स्मार्टफोन्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यांना 2 वर्षांसाठी अपडेट्स मिळतात.