पासवर्ड अन् ओटीपीला रामराम! Vi आणि Meta घेऊन आले नवं लॉग-इन फीचर... सोशल मीडिया अॅप्स वापरणं होणार आणखी सोपं
नव्या प्रोटोकॉलचा उद्देश इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि फेसबूकसह मेटाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ऑनबोर्डिंग (रजिस्ट्रेशन आणि लॉग-इन) प्रोसेस आणखी जास्त सुरक्षित आणि सुलभ करणं, असा आहे. तसेच लॉगिन करताना आवश्यक असणाऱ्या काही मॅन्युअल स्टेप्स हटवून ही प्रोसेस अधिक वेगवान करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
नेटवर्क-बेस्ड व्हेरिफिकेशन टेक्नोलॉजी पासवर्डशिवाय लॉगिन करण्याची पद्धत इनेबल करते आणि यासोबतच यूजर्सना ओटीपीसाठी विनंती करण्याची गरज देखील संपवते. याशिवाय, टेलीकॉम सर्विस प्रोवाइडरने असा दावा केला आहे की, साइलेंट मोबाइल व्हेरिफिकेशन यूजरची डिजीटल ओळख फिशिंग अटॅक्स आणि दुसऱ्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवणार आहे.
गुरुवारी, टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर आणि मार्क झुकरबर्गच्या मालकीची टेक कंपनी मेटाने भारतात व्हिआयची नवीन SMV टेक्नोलॉजी सादर केली. या सर्विसच्या मदतीने आता लवकरच भारतातील Vi सब्सक्राइबर्स केवळ फोन नंबर एंटर करून इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि फेसबूकमध्ये लॉगिन करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
SMV टेक्नोलॉजीसोबतच मेटाचे सोशल मीडिया अॅप्स सत्यता तपासण्यासाठी Vi च्या सेलुलर नेटवर्कवर एक व्हेरिफिकेशन सिग्नल पाठवतील. एका व्हेरिफाय झाल्यानंतर यूजर्स पासवर्ड किंवा ओटीपीशिवाय सोशल मीडिया अॅप्समध्ये लॉगिन करू शकणार आहेत. जर मेटाचे सोशल मीडिया अॅप्स व्हेरिफिकेशन पूर्ण करू शकले नाहीत तर यूजरला सोशल मीडिया अॅप्सच्या अॅक्सेस दिला जाणार नाही.
व्हिआयने दावा केला आहे की, SMV प्लॅटफॉर्मवर नवीन यूजर्सचे रजिस्ट्रेशन, मोबाईल नंबर्सचे व्हेरिफिकेशन, लॉगिन आणि री-लॉग-इन प्रोसेस, अकाऊंट रिकवरी आणि सिक्योरिटी चेकदरम्यान ऑथेंटिकेशन देखील फास्ट-ट्रॅक केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सिक्योरिटी प्रोटोकॉल बॅकग्राउंडमध्ये काम करणार आहे.
SMV टेक्नोलॉजीमुळे यूजर्सना त्यांचे व्हेरिफिकेशन क्रेडेंशियल्स मॅनुअली एंटर करण्याची गरज भासत नाही. तसेच Vi सब्सक्राइबर्सना ऑथेंटिकेशनसाठी वेगवेगळ्या अॅप्समध्ये स्विच करण्याची गरज भासत नाही. तसेच व्हेरिफिकेशन मेसेजची वाट पाहण्याची देखील गरज नसते. कारण व्हेरिफिकेशन विनंती थेट टेलिकॉम नेटवर्कद्वारे प्रमाणित केल्या जातात. या नेटवर्क-बेस्ड व्हेरिफिकेशन प्रोटोकॉलबाबत आता असा दावा करण्यात आला आहे की, हे अधिक चांगली सुरक्षा ऑफर करते. कारण क्रेडेंशियल्स आणि ओटीपी यूजर्सना एंटर करण्याची गरज भासत नाही.
टेलीकॉम सर्विस प्रोवाइडरने असा देखील दावा केला आहे की, SMV ‘फशिंग आणि डिजिटल आइडेंटिटी रिस्क’ विरोधात जास्त सुरक्षा देणार आहे. तसेच व्हिआयने घोषणा केली आहे की, SMV टेक्नोलॉजी आणखी जास्त प्लॅटफॉर्म्स आणि इकोसिस्टम पार्टनर्ससाठी उपलब्ध करण्याची तयारी सुरु आहे.






