एक डिव्हाइस आणि संपूर्ण नेटवर्क ठप्प! Mobile Jammer म्हणजे नेमकं काय? दिल्ली पोलिसांनी का बंद केले इंटरनेट?
याचा उद्देश असा आहे की, मर्यादित क्षेत्रात काही काळापुरते मोबाईल नेटवर्क तात्पुरते ब्लॉक करणे, ज्यामुळे व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. पण मोबाईल जॅमर म्हणजे नक्की काय आणि याचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबाबत आता जाणून घेऊया.
खरं तर मोबाईल जॅमर एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहे, जे मोबाईल नेटवर्कच्या फ्रीक्वेंसीवर रेडियो सिग्नल उत्सर्जित करते. हे सिग्नल मोबाईल टॉवरमधून येणाऱ्या नेटवर्क सिग्नलमध्ये अडथळे निर्माण करते. यामुळे फोनला नेटवर्कला कनेक्ट होऊ शकत नाही किंवा इंटरनेट बंद होते. पण याचा परिणाम एका मर्यादित क्षेत्रापर्यंतच होतो. जेव्हा एखादा व्यक्ती या मर्यादित क्षेत्रातून बाहेर पडतो किंवा जॅमर बंद केला जातो, त्यावेळी मोबाईल नेटवर्क पुन्हा पूर्वीप्रमाणे काम करू लागते.
जेव्हा मोबाईल जॅमर चालू केला जातो, तेव्हा तो 3G, 4G आणि 5G नेटवर्कच्या फ्रिक्वेन्सीवर रेडिओ लहरी पाठवतो. या लहरी मोबाईल टॉवरच्या सिग्नलपेक्षा जास्त पावरफुल असतात, ज्यामुळे फोनला टॉवरशी कनेक्शन स्थापित करता येत नाही. तुमचा फोन जॅमरच्या रेंजमध्ये येताच फोनमधून मोबाईल नेटवर्क गायब बोते, कॉल लागत नाही, मोबाईल डेटा बंद होतो आणि एसएमएस सेवेवर देखील परिणाम होतो.
तुम्ही जर अशा एखाद्या क्षेत्रात असाल जिथे मोबाईल जॅमर लावले आहेत, तर सर्वात आधी त्या क्षेत्रातून बाहेर या. काही वेळ प्रतिक्षा करा. तरी देखील तुमच्या फोनमध्ये नेटवर्क येत नसेल तर फोन रिस्टार्ट करा.
जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या सिजीपीच्या आंदोलनादरम्यान सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी या पोर्टेबल मोबाइल जॅमरचा वापर केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांचे असे मत आहे की, यामुळे जमावामधील प्रत्यक्ष संवाद मर्यादित ठेवण्यास आणि पोलिसांच्या संवेदनशील कारवाईचे व्हिडिओ किंवा थेट प्रक्षेपण सोशल मीडियावर तात्काळ शेअर होण्यापासून रोखण्यास मदत होऊ शकते.






