भारतात Jio तर पाकिस्तानात ही टेलिकॉम कंपनी आहे आघाडीवर! 1GB मोबाइल डेटाची किंमत वाचून डोक्याला लावाल हात
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन – इंडिया यांचा समावेश आहे. तर भारतातील बीएसएनएल ही भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीचा विचार केला तर जिओचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. भारतात जिओचे सर्वाधिक युजर्स असल्याचं मानलं जातं कारण जिओ त्यांच्या ग्राहकांना चांगला नेटवर्क आणि उत्तम सुविधा ऑफर करते. भारतातील टेलिकॉम कंपन्यांबद्दल तर आपल्याला माहिती आहे. पण पाकिस्तानातील टेलिकॉम कंपन्यांबद्दला तुम्हाला माहिती आहे का?
पाकिस्तानमध्ये भारता एवढे चांगले टेलीकॉम इन्फ्रास्ट्रक्चर नाही. मात्र तरीही तिथे टेलीकॉम कंपन्यांचा दबदबा आहे. पाकिस्तानमध्ये अनेक प्रमुख दूरसंचार कंपन्या आहेत. ज्यामध्ये पाकिस्तान मोबाइल कम्युनिकेशंस लिमिटेड (पीएमसीएल) (जैज) चा सर्वात मोठा हिस्सा आहे. भारतात ज्याप्रमाणे टेलिकॉम कंपन्यांमध्ये जिओ आघाडीवर आहे. त्याप्रमाणे पाकिस्तानात टेलिकॉम कंपन्यांमध्ये पीएमसीएल आघाडीवर आहे. यानंतर पाकिस्तानात चाइना मोबाइल पाकिस्तान (सीएमपैक) (जोंग) आणि टेलीनॉर पाकिस्तान लिमिटेड यांचा वापर केला जातो. याशिवाय दुसऱ्या टेलिकॉम ऑफरेटर्सचा विचार केला तर त्यामध्ये पाक टेलीकम्युनिकेशन मोबाइल लिमिटेड (यूफोन) आणि पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन कंपनी लिमिटेड (पीटीसीएल) यांचा समावेश आहे. पाकिस्तान मोबाइल कम्युनिकेशंस लिमिटेडचे युजर्स 8 करोड आहेत. यानंतर टेलीनॉर सारख्या कंपन्या यादीमध्ये आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारताशी तुलना करता पाकिस्तानातील टेलीकॉम इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत वाईट आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानात इंटरनेट प्रचंड किंमती आहे. भारतात 1 जीबी डेटासाठी 20 ते 30 रुपये मोजावे लागतात, तर पाकिस्तानात 1 जीबी डेटासाठी 80-90 रुपये मोजावे लागतात. परंतु भारताच्या तुलनेत पाकिस्तानातील इंटरनेट अत्यंत वाईट आहे.
एकीकडे, भारत डिजिटल आघाडीवर वेगाने प्रगती करत आहे, तर दुसरीकडे, पाकिस्तान बुडत आहे. मोबाईल इंटरनेटबद्दल बोलायचे झाले तर, भारताची गणना जगातील सर्वात स्वस्त डेटा प्लॅन असलेल्या देशांमध्ये होते. जर आपण भारतातील टेलिकॉम पायाभूत सुविधांबद्दल बोललो तर येथील सेवा अनेक देशांपेक्षा चांगली आहे. रिलायन्स जिओचा येथे सर्वात मोठा ग्राहकवर्ग आहे. एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही कंपन्या देशात 5G सेवा देखील देत आहेत. पाकिस्तान हा भारताचा शेजारील देश आहे. मात्र तरी देखील तिथे इंटरनेटची किंमत प्रचंड जास्त आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानात इंटरनेटची किंमत 5 टक्क्यांनी जास्त आहे.






