मुहूर्त ठरला! GTA VI ची लाँच डेट आली समोर... काय असणार खास? जाणून घ्या सविस्तर
Tech Tips: ‘Restart’ ची सवय अन् स्मार्टफोनचा परफॉर्मंस होईल दमदार! जाणून घ्या गेमचेंजर फायदे
टेक-टूने एका अहवालात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2027 दरम्यान 8 ते 8.2 अब्ज डॉलर्सची निव्वळ कमाई अपेक्षित आहे. असे मानले जाते की या अंदाजाचा सर्वात मोठा भाग GTA 6 च्या विक्री आणि संबंधित महसुलातून येईल. गेल्या काही महिन्यांपासून गेमच्या लाँच डेटबाबत वेगवेगळ्या बातम्या आणि पोस्ट समोर येत होत्या. मात्र आता अखेर कंपनीने केलेल्या अधिकृत घोषणेमुळे सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
रॉकस्टार गेम्सची GTA सीरीज आधीपासूनच जगातील सर्वात यशस्वी गेम फ्रेंचाइजपैकी एक मानली जाते. यामुळे GTA 6 केवळ एक गेम नाही तर संपूर्ण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी सर्वात मोठ्या लाँचपैकी एक मानला जात आहे. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, गेम रिलीज झाल्यानंतर काही दिवसांतच अब्जावधी डॉलर्सची कमाई करू शकतो. यामुळे केवळ गेमची विक्री होणार नाही तर ऑनलाईन मोड, इन-गेम खरेदी आणि भविष्यात येणाऱ्या अपडेट्समुळे देखील कंपनीला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.
2013 मध्ये लाँच झालेला Grand Theft Auto V आज देखील जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या व्हिडीओ गेम्सच्या यादीत समाविष्ट आहे. रिपोर्ट्सनुसार, या व्हिडीओ गेम्सच्या सुमारे 23 करोड प्रती विकल्या गेल्या आहेत. यामुळे आता आगामी GTA 6 कडून अपेक्षा आणखी जास्त वाढल्या आहेत. कंपनीच्या कमाईमधअये GTA Online आणि NBA 2K सारख्या गेम्सचा मोठा वाटा आहे. गेममधील खरेदी आणि ऑनलाइन कंटेंट हे कंपनीसाठी उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत.
टेक टूने असे देखील संकेत दिले आहेत की, GTA 6 लवकरच सुरु केले जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या महिन्यांत नवीन ट्रेलर, गेमप्ले व्हिडीओ आणि प्री-ऑर्डर संबंधित मोठ्या घोषणा पाहायला मिळू शकतात.






