शिवसेनेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना भाजपने पक्षात घेतल्याने शिंदे गटातील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यातच एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवरच बहिष्कार घातला होता.
प्रोजेक्ट सुविता २०२५ मध्ये पालकांवर आणि २०२३ मध्ये आशा कर्मचाऱ्यांवर घेतलेल्या सर्वेक्षणांमध्ये पुढील निष्कर्ष समोर आले आहेत. १,१९२ पालकांपैकी ७० टक्के पालकांना सुविताकडून एसएमएस आल्याचे आठवते.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. डिसेंबर महिन्यात 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला निकाल जाहीर होणार आहे.
भारताच्या पहिल्या जागतिक हवामान कृती आणि सोल्युशन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या मुंबई क्लायमेट वीक (MCW) ने फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमापूर्वी आज क्लायमेट इनोव्हेशन चॅलेंजच्या शुभारंभाची घोषणा केली.
भाजपकडून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांत माजी नगरसेवकांना पैसा देऊन पळवून लावण्याचे प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
आझाद मैदानावर नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित पाच दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
Mahayuti News: काल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर आज शिंदे अचानक दिल्लीला गेल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
या प्रस्तावानुसार मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे राज्यातील सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील जमिनी, भुखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेनेची प्री-कॅबिनेट बैठक झाली. त्यानंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मात्र एकनाथ शिंदे यांना वगळता शिवसेनेचा एकही मंत्री उपस्थित नव्हता.
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकप्रिय शिल्पकार राम सुतार यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या नोएडातील निवास्थानी करण्यात आला.
Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत एनडीएने प्रचंड मोठे बहुमत प्राप्त केले आहे. तर महाआघाडीचा सुपडासाफ झाला आहे.
बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. एनडीएने बिहारचा गड राखला आहे. दरम्यान भाजपने बिहारसाठी स्टार प्रचारक घोषित केले होते. या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील नाव होते.
नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सिंहस्थ कुंभमेळ्यात ७५ वर्षानंतर त्रिखंड योग जुळून आल्याने हे कुंभपर्व विशेष असून ते २८ महिने चालणार आहे. ४० ते ४२ पर्वस्नान आणि महत्वाचे अमृतस्नान या कुंभात होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास सादरीकरणाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या आज दुसऱ्या दिवशी हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुप्रसिद्ध गायक विशाल मिश्रा यांची लाइव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते.
रुबी हॉस्पिटल हे जागतिक स्तरावरील रूग्णांची सेवा देण्यासाठी ओळखले जाते आणि आता त्याच दर्जाची सुविधा गडचिरोलीत उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तंत्रज्ञानाने घडवून आणलेली उलथापालथ समजून घेऊन ते योग्य दिशेने वळविण्याचे आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे कार्य संस्कार भारतीसह सर्वांना करावे लागेल, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.