अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत (Photo Credit - X)
मराठवाड्यावर पावसाचा मोठा कहर
यंदा पावसाने राज्याच्या तुलनेत मराठवाड्यामध्ये अधिक कहर माजवला. शेतांना तळ्याचे स्वरूप आले, शेतीपिके पाण्याखाली गेली आणि जमीन खरडून निघाली. हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतला. संभाजीनगरमधील पैठण, धाराशिव (उस्मानाबाद) आणि लातूर सारख्या भागांत केंद्रीय पथकाने बांधावर जात पाहणी केली होती. शेतकऱ्यांनी आपली झालेली दयनीय अवस्था पथकातील अधिकाऱ्यांना दाखवली होती.
केंद्रीय पथकात कोण होते?
सदरील पथकाचे नेतृत्व केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. के. पांडेय यांनी केले होते. अतिवृष्टीग्रस्तांना एनडीआरएफच्या (NDRF) निकषानुसार मदत दिली जाते. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर केंद्र सरकार मदतीची ही रक्कम राज्य सरकारला देईल.
अहवालाची प्रतीक्षा
जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर पंचनामे करून अहवाल राज्य सरकारला सादर केला. राज्य सरकारनेही सर्व निकष बाजूला ठेवत मदत जाहीर केली. त्यानंतर केंद्राने मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी हे पथक पाठवले.






