हमदने देशाशी संबंधित संवेदनशील माहिती कोणत्याही परदेशी व्यक्ती किंवा संघटनांना विकली का याचाही केंद्रीय संस्था तपास करत आहेत. पोलिस आता त्याच्या परदेश प्रवासाची आणि त्यांच्याशी संबंधित लोकांची सखोल चौकशी करत…
नवी मुंबईतील विविध व्यावसायिकांना सोशल मीडिया एक्स (ट्विटर) च्या माध्यमातून धमक्या देण्याचे, बदनामी करण्याचे आणि खोट्या माहितीच्या आधारे मानसिक त्रास देण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.
अर्नाळा येथील एकाच कुटुंबातील तिघांवर मध्यरात्री प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अवघ्या 72तासात अटक करण्याची कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-3 ने केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ८ ऑक्टोबरच्या मुंबई दौऱ्यामुळे गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जलमार्ग पूर्ण दिवस बंद राहणार आहे. सुरक्षेमुळे अलिबाग-मांडवा फेरीसेवा ठप्प, प्रवासाचे नियोजन बदला.
गणेशोत्सव, दुर्गा पूजा आणि विजयादशमी सणांनंतर आता मुंबईतील बाजारपेठा आता दिवाळी खरेदीसाठी सज्ज झाल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी ड्रोन आणि उडत्या कंदीलांबद्दल नियम जारी केले आहेत.
नवरात्रोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, काही मंडळांनी ध्वनी मर्यादेचे नियम पाळले नाहीत. याच पार्श्वभूमीवर नेरूळ पोलिसांनी ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने एका व्यावसायिकाच्या बेकायदेशीर अटकेबद्दल मुंबई पोलिसांना फटकारले आहे. याप्रकरणी न्यायालयाने म्हटले आहे की, पोलिसांनी जामीन मिळू नये म्हणून त्या व्यक्तीविरुद्ध जाणूनबुजून कलम ४०९ लागू केले.
२८ सप्टेंबर रोजी आरोपींनी त्याच्यावर ₹१ कोटींच्या मुदत ठेव हस्तांतरणासाठी दबाव आणला. यावेळी पीडितेला फसवणुकीचा संशय आला आणि त्याने तातडीने आरएके मार्ग पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
2 ऑक्टोबरला विजयादशमी अर्थात दसऱ्या दिवशी मुंबईत शिवाजी पार्क येथे शिवसेना ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.याचपार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले.
आरोपींपैकी स्वप्निल शेडगे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा उपशहरप्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या जीवनप्रवासावर एक नवा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात काही आतापर्यंत कुठेच न उलगडणारे क्षण चित्रित करण्यात आले आहेत.
मुंब्रा – पनवेल रस्ता, मंजरली येथे गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मागील बाजूस मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी मद्याचा साठा आढळून आला.
हा मेल कोणी केला, याबद्दल स्पष्टता नाहीये. सहार विमान तळाला देखील ही धमकी देण्यात आली आहे. याशिवाय सहारा विमानतळाच्या शौचालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे.
मुंबईच्या जवळील काशीमिरा पोलीस ठाणेहद्दीत पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय रॅकेट उघड केलं आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे यात41 वर्षीय मालिका विश्वातील अभिनेत्रीचा देखील सहभाग असल्याचं उघड झालं आहे.
मुंबई पोलिसांनी शहर आणि राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. धमकीचा तपास करण्यासाठी वेगवेगळ्या कोनातून तपास केला जात आहे. आरोपीची चौकशी केली जात असून त्याच्या पार्श्वभूमीची माहिती घेतली जात आहे.
मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा धमकीचा संदेश पाठवण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी सर्व काही नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे.