बुलढाण्यात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न (File Photo)
पत्नीच्या दागिन्यांसंदर्भात केलेल्या तक्रारीवर बोरखेडी पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला. यावरूनच तारापूर येथील गोपाल चव्हाण या व्यक्तीने बुलढाणा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. २६) घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. मात्र, पोलिस अधीक्षक कार्यालयातील उपस्थित अधिकारी व अंमलदारांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
गोपाल चव्हाण (रा. तारापूर, ता. मोताळ्य) यांनी काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नीच्या दागिन्यांसंदर्भात बोरखेडी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन कोणतीही कारवाई केली नाही, असा चव्हाण यांचा आरोप होता. वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने हताश झालेल्या चकाण यांनी शुक्रवारी सकाळी साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. पोलिस अधीक्षक कार्यालयाचे प्रवेशद्वार गाठले आणि तिथेच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले. ही बाब उपस्थित प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पोलिस अंमलदारांच्या तत्काळ लक्षात आली. त्यांनी आरडाओरड करत कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
हेदेखील वाचा : Sambhajinagar Crime:पत्नीने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पतीचाही गळफास; कर्जबाजारीपणामुळे घेतला टोकाचा निर्णय
दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अंबुलकर आणि पोलिस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखांच्या अधिकारी व अंमलदारांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. क्षणाचाही विलंब न लावता चव्हाण यांना पकडले आणि त्यांच्या आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे कोणतीही गंभीर घटना घडली नाही आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेदेखील वाचा : आता आत्महत्या रोखायला मदत करणार स्पेशल App, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ठरणार बेस्ट!