Chandrapur News: नागपुरात काँग्रेस सक्रिय, ठाकरे गट बॅकफूटवर? राजकीय गणितं बदलतली, सत्तासंघर्षाची रंगत वाढली
चंद्रपूर महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता लहान पक्षांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांनी एक मोठे विधान केले आहे. गिहे म्हणाले की, ‘आता तडजोडीची वेळ संपली आहे. जो पक्ष आमचा महापौर करण्यास तयार असेल, आम्ही त्याच पक्षाला पाठिंबा देऊ किंवा त्यांच्यासोबत जाऊ.’ या विधानाने महाविकास आघाडीत आणि युतीतही खळबळ उडवली आहे. असे असले तरी शिवसेना उबाठा शिवाय बहुमताचा जादुई आकडा आपल्याकडे असेल असा विश्वास काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते मंडळी व सहयोगी नगरसेवकांना असल्याने काँग्रेसने आता उबाठाला दूर सारून सत्ता स्थापनेची तयारी सुरू केल्याने शिवसेना उबाठा काय पाऊल उचलणार याकडे लक्ष लागले आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
मनपामध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस व भाजपकडे स्पष्ट बहुमत नाही, असे असताना महापौरपदाच्या पूर्वी गटनेता कुणाचा यावर ‘ताई व भाऊ मध्ये संघर्ष सुरू झाला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात सोमवारी नागपुरात पक्षश्रेष्ठीनी बैठक घेतली, पण तोडगा निघाला नाही. चानोरकर यांच्याकडे १५ तर वडेट्टीवार यांच्याकडे १२ नगरसेवक आहेत, काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत हे विशेष.
शिवसेना उबाठा गटाला कुठल्याही परिस्थितीत महापौरपद दिले जाणार नाही. भाजप आपल्या संख्याबळाच्या जोरावर आणि मित्रपक्षांच्या मदतीने स्वतःचा महापौर बसवण्यासाठी आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडू.- आ. सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर
Maharashtra Politics: “भाजप आपला मित्र…”; एकनाथ शिंदेंचे नगरसेवकांना मार्गदर्शन
आम्ही निवडणुकीपूर्वी काँग्रेससोबत आघाडी केली व सत्तेसाठी पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. आम्ही शब्दाला जागणारी माणसे आहोत, परंतु, काँग्रेसच्या पूर्वी आमची चंद्रपूरच्या जनतेसोबत कायमची आघाडी आहे. आमची लढाई सत्याची आहे सत्तेची नाही. ती चंद्रपुरातील जनतेच्या हिताची आहे. त्यामुळे, मनपातील भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष समर्थन देणाऱ्या एखाद्या माजी नगरसेवकाला काँग्रेसने सत्तेत सामावून घेतल्यास आम्हाला तटस्थ राहण्याच्या पर्यायाचा विचार करावा लागेल, तसे झाले नाही तर आम्ही काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देऊ.- पप्पू देशमुख, नगरसेवक, भाशेकाप






