संग्रहित फोटो
कोल्हापूर : हायवे ट्रॅफिक शाखेकडे बदली करून देण्याचे आमिष दाखवून सहा पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष यशवंत खरात (वय २७, रा. सांगलीवाडी, सांगली) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी (दि. ११) पहाटे सांगलीवाडीतून अटक केली आहे. या प्रकरणात त्याच्या आणखी काही साथीदारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी त्याची बँक खाती गोठवली असून, आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. जिल्हा पोलिस दलातील सहा पोलिसांची १३ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मनोज सबनीस याला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून सांगलीवाडी येथील संतोष खरात याचे नाव समोर आले. पोलिसांनी मंगळवारी पहाटे त्याच्या घरी छापा टाकून त्याला अटक केली.
खरात याची बँक खाती गोठवली
गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार सबनीस याने पोलिसांकडून घेतलेले पैसे खरात याच्या बँक खात्यावर पाठवले होते. त्यामुळे पोलिसांनी खरात याची बँक खाती गोठवली आहेत. त्याच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.
आणखी काही संशयिताचा सहभाग
या प्रकरणात आणखी काही संशयिताचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. अटकेतील सबनीस आणि खरात यांच्या चौकशीतून गुन्ह्याची व्याप्ती स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील रॅकेटचा उलगडा होऊ शकतो.
हे सुद्धा वाचा : मित्रानेच मित्राला संपवलं; पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात कामगाराचा खून
मनीलॉन्ड्रींगच्या धाकाने सहा लाख उकळले
पुण्यातील मगरपट्टा येथील एका तरुणीला आधार कार्डचा गैरवापर करून त्याद्वारे मनी लॉन्ड्रींग झाले आहे. यामुळे यात तुम्हाला अटक करावे लागेल असे सांगून सायबर चोरट्यांनी तरुणीकडून 8 लाख 89 हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने मनीलॉन्ड्रींग झाले असून, आधार कार्डचाही गैरवापर करण्यात आला आहे. तुम्हाला अटक होऊ शकते असे धमकावून केस क्लिअर करण्यासाठी एनओसी सर्टीफिकेट देतो असे सांगून तरुणीकडून 5 लाख 89 हजार रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमर काळंगे करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात गुंतवणूकीच्या आमिषाने दोघांची फसवणूक; तब्बल 66 लाखांना घातला गंडा