विम्याचे दोन कोटी हडपण्यासाठी जीवंत असतानाच केला तेरावा; लेकाला मिळाली बापाची साथ (फोटो : संग्रहित फोटो)
पुणे : अर्धांगवायूचा झटका आलेल्या पतीच्या खात्यातून परस्पर १ कोटी ४० लाख रुपयांची रोकड काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ८४ वर्षीय ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, सुनेवर फसवणूक तसेच अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कर्वेनगर भागात राहतात. त्या निवृत्त शिक्षिका आहेत. त्यांचा मुलगा ६० वर्षांचा आहे. त्याला अर्धांगवायूचा झटका आल्याने तो अंथरुणाला खिळून आहे. त्यांना १८ वर्षांचा नातू आणि २४ वर्षांची नात आहे. गेल्या काही वर्षांपासून मुलगा, सून, नातवंडे वेगळे राहतात. दरम्यान, मुलाचे पत्नीशी पटत नसल्याने १२ वर्षांपासून मुलगा आईसोबत राहतो. एप्रिल २०२४ मध्ये मुलाला अर्धांगवायूचा झटका आला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेची माहिती तक्रारदार महिलेने सुनेला दिली. त्यानंतर चार ते पाच वेळा सून मुलाला भेटण्यास रुग्णालयात आली.
बँक खात्यात पैसे नसल्याचे उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठ महिलेने बँकेत जाऊन चौकशी केली. तेव्हा बँक खाते, समभागातील गुंतवणूक, म्युच्युअल फंड, दरमहा बाजूला टाकलेली रक्कम अशी एकूण मिळून १ कोटी ४० लाखांची रक्कम सुनेने स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
रक्कम शिल्लक नसल्याने ज्येष्ठ महिलेला उदरनिर्वाह आणि ६० वर्षांच्या मुलाच्या ओैषधोपचारासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे ज्येष्ठ महिलेने तक्रारीत म्हटले आहे. सूनेने परस्पर अंथरुणाला खिळलेल्या मुलाच्या बँक खात्यातून रक्कम काढून घेतल्याने त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली, अशी माहिती अलंकार पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी दिली.