PMC Election Result 2026: पुण्यात भाजपाचा डंका; अजित पवार निष्प्रभ! काँग्रेसने कसेबसे अस्तित्व राखले
मुंबई महापालिकेनंतर सर्वाधिक आर्थिक उलाढाल असलेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे सर्वांचे लक्ष लागले होते. सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना पुण्याचा कारभारी बदलण्यात यश आले नाही. पुणेकरांना मोफत मेट्रो आणि बस प्रवासाची घोषणा उपमुख्यमंत्री पवार यांनी करून भाजपच्या गोटात चिंता निर्माण केली होती. उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीरनाम्यात दिलेल्या या आश्वासनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टिका केली होती. त्याला उपमुख्यमंत्री पवार यांनी जशाच तसे उत्तर दिले होते. तसेच भाजपने पुणे महापालिकेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत पुण्याचा कारभारी बदला असे आवाहन पुणेकरांना केले होते. परंतु निकालाचा कौल लक्षात घेता, पुणेकरांनी भाजपच्या हातीच सत्ता सोपविली आहे. (Municipal Election Result 2026)
BMC Election Result 2026: फूट आणि फटका, तरीही ठाकरेंचा झुंजार लढा; मुंबईतील ६५ जागांचा खरा अर्थ काय?
महापालिका निवडणुक जाहीर झाल्यापासून विरोधी पक्ष हा गोंधळलेल्या स्थितीतच राहीला. भाजपच्या विरोधात एकत्रित आंदोलन करणारे काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होईल अशी स्थिती होती. परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याची जोरदार तयारी केली. यावेळी महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांना अजित पवार यांची ताकद मिळाली तर अधिक फायदा होईल असे वाटत होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागेच्या वाटपाचा घोळ शेवटपर्यंत सुटला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत महाविकास आघाडीसोबत शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल की नाही हे स्पष्ट झाले नाही किंबहुना काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी त्यांची वाट बघत बसले. पैनवेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीत फुट पडली. नाविलाजाने मनसेला महाविकास आघाडीने सोबत घेतले. परंतु, त्याचाही उपयोग झाला नाही. भाजपच्या विरोधात एक सक्षम असा पर्याय उभे करण्यात महाविकास आघाडीला यश आले नाही.
महापौर पदासाठी अद्याप आरक्षण झाले नाही. त्यामुळे कोण महापौर होणार याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षातील अनेक ‘सिनियर’ नगरसेवक वा पदासाठी दावेदारी सांगू शकत असतील तरी आरक्षण नेमके कोणत्या गटाला मिळणार याचर सारे गणीत ठरणार आहे. भाजपाकडे एकहाती सत्ता आली असल्याने त्यांना ही निवड करताना फारशी अडचण जाणवणार नाही, मात्र पक्षांतर्गत कुरघोड्यांकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. महीला नगरसेविकांमधून वर्षा तापकीर, रजना टिळेकर या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत, त्यांनी महापालिका सभागृहात चौथ्यांदा प्रवेश मिळविला आहे. तर पुरुष नगरसेवकांमधून माजी सभागृह नेत्यांमध्ये चुरस निर्माण होऊ शकते. यामध्ये गणेश बीडकर आणि श्रीनाथ भिमाले यांची नावे चर्चेत आहे, तसेच जातीय समीकरण लक्षात घेऊन नवेच नाव देखील ऐनवेळी पुढे केले जाऊ शकते. (PMC Election 2026 Result)
महाविकास आघाडीकडून अपेक्षित मुद्दे 1 मांडले जात नव्हते, तसेच प्रभावीपणे मांडणाऱ्या नेतृत्वाची वानवा त्याच्याकडे होती. सक्षम विरोधी पक्ष म्हणून निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम उपमुख्यमंत्री पवार यांनी निवडणुकीच्या प्रचारात भरून काढली.
2 शिवसेनेच्या फुटीनंतर पुण्यात एकमेव नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेत गेले होते. नऊ नगरसेवक है ठाकरेसोबत राहीले होते. परंतु निवडणुकीचपर्यंत हळूहळू सर्वच जण बाहेर पडले.
माजी आमदार रवींद्र चंगेकर यांनी शिंदेच्या 3 शिवसेनेत प्रवेश केला, परंतु भाजपच्या स्थानिक नेत्याविरोधातील त्यांची वक्तव्ये ही महायुती तुटण्यास कारणीभूत ठरली.
4 दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढल्यामुळे त्यांना काही जागा टिकविण्यात यश आले. तर काँग्रेसनेही काही जागा जिंकत आपले अस्तित्व कायम ठेवण्यात यश मिळविले असले तरी महापालिकेत विरोधी पक्षाची भुमिका सक्षमपणे कोण बजाविणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
अता गतीमान विकास दिसेल
पुणेकरांनी भाजपच्या विकासाच्या भूमिकेला मान्यता दिली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि म देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार याच्यामुळे हा विजय मिळाला आहे. आता गतीमान विकास पाहण्यास मिळेल.
– मुरलीधर मोहोळ
पुण्यातील विकासकामांना न्याय
66 पुण्यात भाजपने केलेल्या विकास कामाना पुणेकरांनी न्याय दिला आहे. मेट्रो, नदीकाठ सुधार प्रकल्प आदी कामे मार्गी लागली. भविष्यातील पुण्याचा आराखडा भाजपने तयार केला आहे. तो आता मार्गी लागेल.
– चंद्रकांत पाटील, मंत्री
बाजू ठामपणे मांडू.
पुणेकरांची बाजू ठामपणे मांडू
८८ पुणेकरांनी दिलेला कोल आम्हाला मान्य आहे. ही निवडणूक प्रक्रीया ज्या पद्धतीने पार पडली ते पुणेकरांनी पाहीले आहे. महापालिका सभागृहात विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्वजण पुणेकरांची
– सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प. गट)
काँग्रेस जनतेसाठीच काम करणार
८८ मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. यापूर्वी काँग्रेसने सभागृहात पुणेकरांचे प्रश्न मांडले, त्याचपद्धतीने पुढील काळात पुणेकरांच्या हितासाठी आमचे नगरसेवक काम करतील,
– अरविंद शिंदे, शहराध्यक्ष काँग्रेस.
८० टक्के समाजकारण हेच ध्येय
66 शिवसेनेच्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केली आहे, ‘ऐशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण’ याच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार काम करीत राहू
– गजानन थरकुडे, (ठाकरे सेना).






