सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणेत खळबळ! गर्भवती समजून उपचार मात्र पोटात निघाला ट्यूमर
सदर महिला सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक परिसरातून सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आली होती. येथे कार्यरत एका डॉक्टरांनी महिलेला गर्भवती असल्याचे निदान करून तातडीच्या उपचारासाठी तिला गोवा येथील बांबोळी मेडिकल कॉलेज येथे रेफर केले. मात्र, गोवा बांबोळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तिच्या पोटात बाळ नसून मोठा ट्यूमर असल्याचे स्पष्ट केले. या घटनेनंतर सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य सेवांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Kolhapur Election Exit Polls: कोल्हापुरात भाजपच बॉस? एक्झिट पोलने उडवली सर्वांची झोप
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अपघातग्रस्त रुग्ण असो वा गंभीर आजाराचे रुग्ण, मोठ्या प्रमाणावर गोवा बांबोळी येथे रेफर केले जात असल्याचे चित्र सातत्याने दिसून येत आहे. तज्ञ डॉक्टरांची कमतरता, अपुरी वैद्यकीय सुविधा, शिकाऊ डॉक्टरांवर अवलंबून असलेले उपचार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष, याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत.
कोणताही आजार असो, योग्य तपासणी आणि तज्ञ उपचारांची सुविधा नसल्यामुळे अनेक रुग्णांना महिनोन्महिने रुग्णालयात ठेवले जाते, मात्र त्यांची दखल घेतली जात नाही, असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या सततच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, गर्भवती समजून उपचारासाठी पाठवण्यात आलेल्या महिलेच्या पोटात चक्क ट्यूमर आढळल्याची घटना आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणाचे गंभीर उदाहरण ठरत आहे.
PUNE NEWS : पुण्यातील दोघा भावांचे ‘लाठी-काठी’ पारंपरिक खेळात यश! नोंदवला खास वर्ल्ड रेकॉर्ड
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा तात्काळ सुधारण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






